Nashik News : डंपरमधून पडणारी वाळू, खडी बेतते जीवावर!

Nashik News : खडी- वाळू डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त भरलेली असल्याने खडी उधळून रस्त्यावर पाठीमागे चालणाऱ्या चारचाकी अन दुचाकी वाहनचालकांवर येऊन आदळते.
dumper with full sand
dumper with full sandesakal
Updated on

मालेगाव : शहर व परिसरासह तालुक्यातील रस्त्यांवर उघडया डंपरने 'खडी-वाळू' वाहतूक सुसाट सुरू आहे. याकडे ना पोलिसांचे लक्ष, ना महसूल विभागचे... खडी- वाळू डंपरमध्ये प्रमाणापेक्षा जास्त भरलेली असल्याने खडी उधळून रस्त्यावर पाठीमागे चालणाऱ्या चारचाकी अन दुचाकी वाहनचालकांवर येऊन आदळते. परिणामी अनेकदा अचानक उधळलेल्या खडीने अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. पोलिसांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (Sand and gravel falling from the dampers causes accident)

महामार्ग असो, की चाळीसगाव फाटा परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी क्रशर असल्याने या उघड्या डंपरवर कारवाई करण्याची मागणी होत आहे. आधीच गौण खनिज वाहतूक करणाऱ्यांना प्रमाणबद्धता व डंपरवर ताडपत्री झाकणे बंधनकारक असताना या नियमांकडे दुर्लक्ष होत आहे. मोटार परिवहन विभागाच्या अधिकारीही चिरीमिरी घेऊन डोळेझाक करतात अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.

भरधाव जाणाऱ्या ट्रकमधून दगडाचा बारीक किस व वाळू जोरदार हवेमुळे उडते. त्यामुळे रस्त्यावर चालणाऱ्या वाहनधारकांच्या डोळ्यात जाऊन इजा होते. यातून अनेकदा अपघातही घडत आहेत.चांगल्या रस्त्यावर शिगोशिग भरलेली खडी गळती होऊन पडल्याने दुचाकी घसरून अपघात घडतात. वाळू वाहतूक होणाऱ्या रस्त्यांवरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने वाळू, माती आणि खडी वाहतूक करणाऱ्या वाहने विशेषत: ट्रकवर ताडपत्री झाकणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अनेक वाहनचालक प्राधिकरणाचा नियम धाब्यावर बसवून सर्रास वाळू वाहतूक करतात. (latest marathi news)

dumper with full sand
Nashik Simhastha Kumbh Mela : सिंहस्थ आराखड्यातून 500 कोटींची कामे वगळली

त्यामुळे वाळू डोळ्यात गेल्याने तालुक्यात अनेकांना डोळ्यांची गंभीर इजाही झालेली आहे. उघड्या डंपर व ट्रकने वाळू आणि खडी वाहतूक करणाऱ्या वाहनचालक आणि मालकांवर प्रादेशिक परिवहन प्राधिकरण नियमानुसार दंडुका उगारणार का? असा प्रश्न संतप्त सर्वसामान्य नागरिकांनी केला आहे.

"रस्त्यावरून वाळू व खडी वाहतूक करणाऱ्या उघड्या वाहनांनी ताडपत्री आच्छादन केल्यास इतरांना इजा पोहोचणार नाही. अपघात होणार नाही याची काळजी घ्यावी. उघड्या वाहनांवर पोलिसांनी कारवाई करावी." - शशिकांत भदाणे, सामाजिक कार्यकर्ते, दापूरे.

dumper with full sand
Nashik News : जिल्‍हा बँकेचे प्रशासक, सीईओंना ठार मारण्याची धमकी!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com