Nashik News : शाळा 2 दिवसांवर; ना कापड, ना मापे! शिक्षक संघटनांची नाराजी

Nashik News : राज्यातील शाळा शनिवार (ता.१५) पासून सुरू होत असून, दरवर्षी पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येतात.
school uniform
school uniformesakal
Updated on

Nashik News : राज्यातील शाळा शनिवार (ता.१५) पासून सुरू होत असून, दरवर्षी पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येतात. यंदाच्या गणवेशाबाबत दोन दिवसांवर शाळा आली तरीही कुठल्याही प्रकारचे नियोजन झाले नसल्याने या गोंधळाच्या परिस्थितीवर प्राथमिक शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. (Malgaon School start in 2 days but there is no school uniform ready for student)

समग्र शिक्षा अभियानांतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेशाचे दोन संच पुरविण्यासाठी तीनशे रुपये याप्रमाणे अनुदान व्यवस्थापन समितीकडे उपलब्ध करुन दिले जात होते. दरवर्षी नवीन सत्रात पहिल्याच दिवशी गणवेश वितरीत केले जायचे. या योजनेचे कार्यान्वयन व्यवस्थित सुरु असतांना यंदा यामध्ये विनाकारण बदल केला, अशी शिक्षक समितीची ठाम धारणा आहे.

सद्यस्थितीत दोन दिवसांवर शाळा सुरू होत असतांना विद्यार्थ्यांना योग्य मापाचे नियमित गणवेश कसे मिळतील? अंदाजे मापे गृहीत धरुन गणवेश शिलाई केल्यामुळे विद्यार्थ्यांना योग्य मापाचा गणवेश न मिळाल्यास पालकांच्या रोषाला स्थानिक पातळीवर शिक्षकांना सामोरे जावे लागणार आहे.

त्यामुळे नियमित गणवेशासह स्काऊट, गाईडचे गणवेश शिलाई करुनच शाळांना मिळावेत, अशी मागणी राज्य प्रकल्प संचालक शिक्षण विभाग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली असल्याची माहिती राज्याध्यक्ष विजय कोंबे यांनी दिली. (latest marathi news)

school uniform
Nashik News : ‘इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॅब’ची जागा परत करण्याचे आदेश; जिल्हाधिकाऱ्यांची ‘सीपीआरआय’ला सूचना

शिक्षकांचे तहसीलसमोर आंदोलन

राज्य सरकारने संच मान्यतेचा सुधारित नवीन निर्णय जाहीर केला आहे. यानुसार जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर कमी होणार असून, अतिरिक्त शिक्षक होण्याचा मोठा धोका या धोरणामुळे झालेला आहे. या धोरणानुसार निवृत्त शिक्षकांना कमी पटाच्या शाळेत मानधनावर नियुक्ती दिल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे डोंगराळ आणि आदिवासी भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहण्याचा धोका निर्माण झाला आहे.

त्यामुळे शासनाचे हे धोरण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता संवर्धनात अडसर निर्माण करणारे आहे. संच मान्यता धोरणाच्या विरोधासह ‘आम्हाला शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या’ यासह शिक्षक व विद्यार्थी हिताच्या प्रश्‍नांबाबत पहिल्याच दिवशी शनिवारी (ता.१५) प्राथमिक शिक्षक समितीतर्फे राज्यातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

school uniform
Nashik News : गोदाघाटावर एका कामावर दुहेरी खर्चाची भीती; सिंहस्थातील कामे ‘नमामि गोदा’ प्रकल्पातून वगळण्याच्या सूचना

"ग्रामीण भागातील सर्व परिस्थिती पाहता व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून यापूर्वी गणवेश देण्याची कार्यपद्धती सुकर होती. यात बदल केल्याने सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. - अनिल जगताप, विभागीय उपाध्यक्ष, शिक्षक सेना

"दोन दिवसांनी प्रवेशोत्सवाने शाळेची सुरुवात होत असतांना गणवेश पोहोचलेले नाहीत. विद्यार्थी व पालक मोठ्या अपेक्षेने या योजनेकडे बघतात. दोन्ही गणवेश एकाचवेळी द्यावेत." - भरत शेलार, राज्य सरचिटणीस, शिक्षक भारती

school uniform
Nashik News : दुष्काळी मदतीपासून 52 हजार शेतकरी वंचित!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.