Nashik Malnourished Children : ग्रामीण भागात 463 बालके कुपोषित! अतिजोखमीच्या सॅम श्रेणीत 38 बालकांचा समावेश

Malnourished Children : आरोग्य विभागाच्या जून २०२४ च्या अहवालानुसार सिन्नर तालुक्यात ग्रामीण भागात तब्बल साडेचारशे बालके कुपोषणग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Malnourished Children
Malnourished Children esakal
Updated on

Nashik Malnourished Children : आरोग्य विभागाच्या जून २०२४ च्या अहवालानुसार सिन्नर तालुक्यात ग्रामीण भागात तब्बल साडेचारशे बालके कुपोषणग्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. अतिजोखमीच्या सॅम श्रेणीत ३८ तर मध्यम जोखमीच्या मॅम श्रेणीत ४२५ बालकांचा समावेश असल्याने आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण विभाग, स्थानिक ग्रामपंचायत स्तरावरून या बालकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. ( Malnourished Children 463 children in rural areas)

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी कुपोषणासंदर्भात सर्व तालुक्यातील आरोग्य अधिकारी व महिला बालकल्याण विभागाच्या प्रकल्प अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कार्यवाहीच्या सूचना केल्या आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालात तालुक्यात कुपोषणग्रस्त बालकांची संख्या वाढल्याचे म्हटले आहे. अंगणवाडी स्तरावर बालकांच्या तपासणीनंतर सिन्नरमधील सात आरोग्य केंद्रांनी त्यांच्याकडची ‘सॅम’ आणि ‘मॅम’ श्रेणीतील आकडेवारी निश्‍चित केली आहे.

तब्बल ४२५ बालके जोखमीच्या असलेल्या ‘मॅम’ श्रेणीत असून नियमित पूरक पोषण आहार मिळाल्यानंतर ही बालके जोखमीच्या श्रेणीतून बाहेर येऊ शकतात. तर अति जोखमीच्या असलेल्या ‘सॅम’ श्रेणीतील बालकांची संख्या ३८ इतकी असून, त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. शून्य ते सहा वर्ष वयोगटातील बालकांचा आरोग्य विभागाने सर्वे केल्यानंतर कुपोषण ग्रस्त बालकांची संख्या निश्‍चित करण्यात आली.

बालकांचे वय आणि उंचीच्या प्रमाणात वजन कमी भरल्यास त्यांची उपोषण श्रेणी निश्‍चित केली जाते. सॅम प्रकारातील बालकांकडे विशेष लक्ष द्यावे लागते. अशा बालकांची आरोग्य केंद्र स्तरावर वैद्यकीय तपासणी करून त्यांना असणारे आजार निश्‍चित केले जातात. वजन न वाढण्याची कारणे शोधली जातात. या बालकांच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष झाल्यास त्यांना रक्ताक्षय होण्याची भीती असते. (latest marathi news)

Malnourished Children
Childrens Health : मुलांनी खोटं बोलणं टाळावं यासाठी काय करावं?

विटामिन, प्रतिजैवके या औषधोपचारासोबतच त्यांच्या दैनंदिन आहाराकडे विशेष लक्ष दिले जाते. एवढे करूनही ही बालके धोक्याच्या पातळीत राहिली तर जिल्हा रुग्णालयातील पोषण पुनर्वसन केंद्रात त्यांना भरती केले जाते. तेथे एक महिन्याचा औषधोपचार व पूरक पोषण आहार देऊन त्यांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. तर ‘मॅम’ श्रेणीतील बालकांना घरी औषधोपचार सुचवून पूरक पोषण आहार देण्याची सूचना केली जाते.

कुपोषित बालकांची अनुक्रमे संख्या

आरोग्य केंद्र---सॅम---मॅम श्रेणी

दापुर : १४ - ८१

देवपूर : ०६ - ५४

सोमठाणे : ०२ - २३

वावी : ०१ - ७२

ठाणगाव : ०१ - ३१

नायगाव : ०४ - ७५

पांढुर्ली : १० - ८९

Malnourished Children
Malnourished Children Pune : पुण्याच्या अंगणवाड्यांमध्ये 346 कुपोषित बालके, कुपोषण मुक्तीसाठी जिल्हा परिषदेची खास मोहीम

''आरोग्य विभागाकडून कुपोषित श्रेणीतल्या बालकांना औषध उपचार सुचवण्यात आला आहे. अति जोखमीच्या श्रेणीतील बालकांना ग्रामपंचायत स्तरावरून पूरक पोषण आहार पुरवण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केल्या आहेत. दोन्ही श्रेणीतल्या बालकांना आवश्यकतेनुसार पूरक उपचारांसाठी संदर्भित करण्यात येईल.''- डॉ. मोहन बच्छाव, तालुका आरोग्य अधिकारी, सिन्नर

प्रकल्प अधिकारी उदासीन?

सिन्नर पंचायत समितीचे बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश सहाणे यांच्याशी बालकांच्या कुपोषणासंदर्भात पंचायत समिती स्तरावरून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहेत, याबाबत भ्रमणध्वनीवरून विचारणा केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बैठकीत ग्रामपंचायतींना कोणत्या सूचना करण्यात आल्या त्यासंदर्भात पत्र पाठवण्याची विनंती केली. मात्र, प्रशासकीय पातळीवर वरिष्ठांकडून गांभीर्याने घेण्यात येणारा कुपोषणाचा विषय श्री. सहाणे यांच्याकडून दुर्लक्षित करण्यात आल्याचे जाणवले.

Malnourished Children
Malnourished Childrens : पिंपरी-चिंचवड शहरात सव्वातीनशे अतिकुपोषित बालके सापडली

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.