Nashik News: मंडल आर्टने मुलांच्या मानसिक आरोग्यात सुधारणा! हॅपी आर्ट फाउंडेशनचा उपक्रम; मुलांमधील एकाग्रता वाढून वागणुकीत बदल

Nashik News : हॅपी आर्ट फाउंडेशन ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना आर्ट ॲण्ड क्राफ्ट तसेच मंडल आर्टद्वारे त्यांच्या भावनिकतेवर काम करतात.
Instructor teaching mandala art to children in schools in Surgana
Instructor teaching mandala art to children in schools in Surganaesakal
Updated on

Nashik News : आदिवासी पाडे, ग्रामीण भागातील पालकांना जिथे दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असते, तिथे मुलांच्या भावनिकतेकडे लक्ष द्यायला वेळ कुठे? केवळ शिक्षण आणि पोषण आहार देऊन मुलांचा सर्वांगीण विकास होत नाही, तर त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्यासाठी मानसिक आरोग्यावर काम करणे महत्त्वाचे असते.

त्यासाठी हॅपी आर्ट फाउंडेशन ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांना आर्ट ॲण्ड क्राफ्ट तसेच मंडल आर्टद्वारे त्यांच्या भावनिकतेवर काम करतात. यातून मुलांच्या वागणुकीत, एकाग्रतेत वाढ होऊन मुलांमधील चिडचिडेपणा, भांडण, मारामाऱ्या कमी होऊन विद्यार्थी विचार करायला शिकतात. (Mandala Art initiative of Happy Art Foundation)

दिल्ली सरकारने २०११ मध्ये विद्यार्थ्यांच्या ‘हॅपीनेस कोशंट’वर काम करण्यासाठी ‘हॅपीनेस करिक्युलम’ उपक्रम शाळांमधून सुरू केला. विद्यार्थी आनंदी असतील तर त्यांचा विकास चांगला होतो. त्यासाठी आर्ट ॲण्ड क्राफ्ट, मेडिटेशन, संगीत कलांशी संबंधित उपक्रम दिल्लीत राबविले गेले. राज्य शासनाने २०२२ मध्ये असा पॅटर्न स्वीकारला. शाळांना मिळणाऱ्या अनुदानातून शाळेच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर अधिक भर दिला जातो.

कसे केले जाते काम?

विद्यार्थ्यांच्या मानसिकेवर काम करणारी ‘हॅपी आर्ट फाउंडेशन’ पहिली संस्था आहे. मुलांच्या भावना मजबूत असतील, तर कोणतीही परिस्थिती ते सहज हाताळू शकतात. फाउंडेशनमार्फत मुलांच्या हॅपीनेसवर प्रोजेक्ट डेव्हलप केले जातात. हॅपी आर्ट असे प्रोजेक्टचे नाव असून, तो मंडल थेरपीवर आधारित आहे.

मंडल थेरपीतून मेडिटेशन होते. त्याचे तंत्र शिकले तर १०० टक्के फरक पडतो. मुलांचे शारीरिक-मानसिक आरोग्य, अभ्यास-वागणूक या चार गोष्टी पडताळून पाहिल्यावर शिक्षकांना विद्यार्थ्यांवर किती काम करावे लागेल, याचा अंदाज बांधता येतो. यातून शिक्षक-विद्यार्थ्यांमधील नात चांगले होते. (latest marathi news)

Instructor teaching mandala art to children in schools in Surgana
Nashik News : प्रत्येक घरात स्वामी सेवा पोचणे गरजेचे : अण्णासाहेब मोरे; समर्थ सेवामार्ग गुरुपौर्णिमा उत्सवास प्रारंभ

शाळांचा अनुभव

सुरगाण्यातील तीन शाळांमध्ये हा प्रकल्प राबविला गेला. शाळेत ४५० मुले होती, ज्यांना एकत्र आणणे शक्त नव्हते. गेल्या तीन महिन्यांत मुले विचार करायला लागली. त्यांच्या वागणुकीत फरक पडला. मारामाऱ्या, भांडणे कमी झाली. एका जागी शांत बसण्याचा संयम त्यांच्यात आला.

"ग्रामीण भागातील मुलांना परिस्थितीमुळे काहीही मिळत नाही. याउलट शहरी भागातील मुलांना न मागता पहिलेच मिळाल्याने ग्रामीण-शहरी भागातील विद्यार्थ्यांच्या मानसिकतेत फरक असतो. पालकत्व चुकीच्या दिशेने गेल्याने पुढची पिढी भरकटलेली तयार होईल. आनंदी कसे राहावे, हे शिकविण्याची गरज आज निर्माण झाली. त्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर काम करणे गरजेचे आहे." - सोनाली जोशी, संचालक, हॅपी आर्ट फाउंडेशन

Instructor teaching mandala art to children in schools in Surgana
SAKAL Impact : मुख्य टपाल कार्यालयाची वाट काहीशी सुकर! अधिकारी, नागरिकांकडून समाधान; ‘सकाळ’ मानले आभार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com