Nashik Manohar Karda Case : कारडा कन्स्ट्रक्शनचे संचालक मनोहर कारडा यांच्या आत्महत्येनंतर तब्बल सहा महिन्यांनी उपनगर पोलिस ठाण्यात ख्यातनाम बांधकाम व्यावसायिक अशोक कटारिया यांच्यासह सहा जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणात आर्थिक व्यवहारांतून संशयितांनी मनोहर कारडा यांचा छळ केल्याचा आरोप करण्यात आल्याने त्या दिशेने तपास करताना पोलिसांकडून मृत व संशयित यांच्यातील आर्थिक व्यवहारांचा तपास केल्या जाण्याची शक्यता आहे. ( Financial transactions will be investigated of karda )
भारती कारडा यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती मनोहर कारडा यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी संशयित अशोक मोतीलाल कटारिया, ग्यान खत्री, सनी सलुजा, कुलदीपसिंग जोहर, आशुतोष राठोड, मनोज चावला यांच्याविरोधात उपनगर पोलिसांत शनिवारी (ता. २७) रात्री गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती कारडा यांनी २१ एप्रिलला उपनगर पोलिसांना अर्ज दिला होता. परंतु त्यात त्यांनी १९ संशयितांच्या नावाचा उल्लेख केला होता. मात्र त्यातील अशोक कटारिया यांच्यासह सहा संशयितांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. श्रीमती कारडा यांच्या जबाबानुसार आणि त्यांनी दिलेल्या काही नोंदीनुसार या सहा जणांविरोधात गुन्हा नोंद केल्याचे पोलिसांनी सांगितले. (Latest Marathi News)
श्रीमती कारडा यांच्या फिर्यादीनुसार, संशयित-कारडा यांच्यातील आर्थिक व्यवहारासंदर्भात कारडा यांनी पैशांची परतफेड केलेली असतानाही संशयितांकडून सातत्याने पैशांची मागणी करीत त्यांना धमकावले जात होते. तसेच व्यवसायातही संगनमताने कारडा यांना मज्जाव केला जात असल्याने मनोहर कारडा यांना संशयितांनी अडचणीत आणले होते.
त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याचा जबाब श्रीमती कारडा यांनी दिला आहे. त्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, याप्रकरणी संशयितांना चौकशीसाठी नोटीस बजावली जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
कटारियांच्या ‘अटकपूर्व’वर आज सुनावणी
उपनगर पोलिसांत दाखल ९९ लाख रुपयांच्या फसवणूक व एमपीआयडी अंतर्गत दाखल गुन्ह्यात नरेश कारडा यांच्यासह अशोक कटारियांचाही समावेश आहे. यासंदर्भात कटारिया यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. त्यावर सोमवारी (ता. २९) सुनावणी होणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.