येवला : दुष्काळी, टंचाईग्रस्त भागातील बागायती शेतीसाठी वरदान ठरणारे वॉटर बॅंक अर्थात शेततळे योजनेला शासनाने मागेल त्याला शेततळे असे नाव दिले असले तरी अनेकांना शेतकऱ्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. विशेष म्हणजे शासनाकडून खोदायला केवळ ७५ हजार रुपयांचे अनुदान दिले जात असून खोदाईसाठी दीड लाखापर्यंत खर्च येत असल्याने या अनुदानात वाढ करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. (Many farmers have to wait for Water Bank scheme)
वॉटर बॅंकेला अवर्षणप्रवण असलेल्या येवला,सिन्नर,चांदवड, मालेगाव,देवळा,नांदगाव आदी दुष्काळी तालुक्यात गावागावात शेकडो शेततळे तयार झाले आहे. मागेल त्याला शेततळे योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला. मात्र मध्यंतरी दोन अडीच वर्षे अनुदानाअभावी शेतकऱ्यांना लाखो रुपये खर्च करून खिशातून खर्चून शेततळ्याची कामे करावी लागली. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा योजनेला गती आली.
विहिरी, कूपनलिका आटल्यावर शेततळ्यातील पाणी हक्काचे ठरते. येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातही शेततळ्यामुळे कांद्यासह इतर उन्हाळी पिके घेता येऊ लागली आहे, हेच वॉटर बँकेचे मोठे यश आहे.मात्र वाढत्या महागाईमुळे शेततळे आता महागडे ठरत आहे. पूर्वी शेततळे खोदाईला ५० ते ७५ हजारापर्यंत खर्च करावा लागत होता.मात्र मजुरी व डिझेलच्या दरवाढीमुळे हाच खर्च आता दीड लाखापर्यंत पोहोचल्याने अनुदानात वाढ करण्याची मागणी आहे.
नाव सोन्याबाई हाती..!
शासनाच्या महा डीबीटी पोर्टलवर अर्ज केला की काही दिवसात लाभार्थ्याला तळे मंजूर होत आहे. लॉटरी पद्धतही बंद झाल्याने पाहिजे त्याला शेततळे मिळू शकते. मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजनेतून शेततळे खोदण्यासाठी आकारमानानुसार १८ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा आधार मिळतोय.मात्र ३० × ३० × ३ मीटरचे म्हणजेच १०० फुटाचे शेततळे खोदण्यासाठी मुरमाड जमिनीत एक लाखाच्या आसपास खर्च येतो. (latest marathi news)
शेत जमिनीत खडक लागला तर ब्लास्टिंग करून दगड फोडावे लागतात. परिणामी हा खर्च दीड लाखापर्यंत देखील जातो, त्या तुलनेत अनुदान मात्र ७५ हजारच रुपये मिळते. २५ ते ७५ हजार रुपये खिशातून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते.
दुष्काळामुळे यंदा अल्प प्रतिसाद!
मागील वर्षी दुष्काळी तालुक्यात शेततळे खोदण्याची स्पर्धा होती.अनेकांनी शेततळे खोदले मात्र पुढे पाऊसच न झाल्याने त्यात प्लास्टिक कागद टाकले नाही. मागच्या वर्षीची अशी स्थिती असल्याने यावर्षी शेततळे खोदण्याला थंड प्रतिसाद मिळत आहेत. किंबहुना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केलेल्यांची संख्या ही घटली आहे.
२३-२४ या आर्थिक वर्षात उपलब्ध ८० कोटीतून ३ हजार ३१६ शेतकऱ्यांना शेततळ्यांकरिता ५०.८१ कोटीचे अनुदानाचे वितरित झाले. तर उर्वरित १ हजार ६६५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू होती. खोदाईनंतर लवकरच अनुदान जमा होत असल्याने ही समस्या सुटली आहे.
असा करावा अर्ज
अर्ज करण्याची प्रक्रिया महा-ई-सेवा केंद्र व तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मिळते. इच्छुक शेतकऱ्यांचे विहित नमुन्यातील अर्ज, संमती या योजनेत भाग घेण्यासाठी अनिवार्य आहे. त्यानंतर https://mahadbt.maharashtra.gov.in/farmer या संकेतस्थळावर विविध कागदपत्रांसह अर्ज दाखल करावा लागतो. याच पोर्टलवर मंजुरीसह सर्व प्रक्रिया पूर्ण करावी लागते.
असे मिळते शेततळे खोदकामाला अनुदान...
आकारमान - शेततळे
२०×१५×३ - २६७७४
२०×२०×३ - ३८४१७
२५×२०×३ - ५००६१
२५×२५×३ - ६५१९४
३०×२५×३ - ७५०००
३०×३०×३ -७५०००
"दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना वरदान ठरल्याने अनेक शेतकरी बागायतदार झाले खरे पण सर्वसाधारण आर्थिक परिस्थिती असलेले शेतकरी स्व खर्च करून तळे करू शकत नसल्याने अनुदान दीड लाख रुपये करावे.यामुळे शेती उत्पन्नात नक्कीच वाढ होईल." - डॉ.सुधीर जाधव,माजी सभापती,बाजार समिती,येवला
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.