Nashik Market Committee : नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारातील माथाडी व मापारी कामगारांच्या हमाली, तोलाई व वाराईची मजूरी पूर्वप्रचलित पद्धतीने होणारी कपात करावी, त्यासंदर्भात संबंधित सरकारी यंत्रणेने तातडीने कार्यवाही न केल्यास हमाल व मापारी कामगार नाशिक जिल्ह्यातील लोकसभेच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे ५००० कामगार व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत असून कामगार दिनापर्यंत न्याय मिळण्याची अपेक्षा माथाडी व मापारी कामगारांनी व्यक्त केली आहे. (Boycott of Mathadi in polling Levy Question Government neglect protest)
सध्या लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता आहे, कोणताही धोरणात्मक निर्णय घेता येत नाही त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात व्यापारी, आडते, खरेदीदार शेतकरी, बाजार समितीचे अधिकारी आणि माथाडी व मापारी कामगारांनी पूर्वप्रचलित पद्धतीने कामकाज करावे, आचारसंहिता संपल्यानंतर राज्य सरकारकडे सर्व संबंधित घटकांच्या प्रश्नासंबंधीचे म्हणणे मांडून धोरणात्मक निर्णय घेण्यास सहकार्य केले जाईल, अशा सूचना नाशिक जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिल्या. (latest marathi news)
जिल्हा उपनिबंधकांनीही अनेक वेळा संयुक्त बैठका घेऊन संबंधितांना सूचना केल्या. तरीही व्यापारींनी कपातीस नकार दिला आहे. त्यामुळे गुंता वाढला आहे. कुणीही लक्ष देत नसल्याने माथाडी व मापारी कामगार लोकसभेच्या मतदानावर माथाडी मंडळाचे सुमारे ५००० नोंदीत माथाडी कामगार व त्यांचे कुटुंबीय बहिष्कार टाकण्याच्या मनःस्थितीत आहेत. माथाडी व मापारी कामगारांमुळे बाजार समित्यांमधील व्यवहार ठप्प झाल्याचा समज संबंधितांकडून पसरविला जात आहे, यास माथाडी व मापारी कामगारांनी आक्षेप घेतला आहे.
जिल्ह्यातील बाजार समित्यांच्या आवारात काम करणाऱ्या माथाडी, मापारी कामगारांच्या हमाली व तोलाईची मजुरी व्यापारी व आडत्यांनी पुर्वप्रथेनुसार शेतकऱ्यांच्या हिशोब पट्टीतून कापून देण्यास विरोध दर्शविल्यामुळे बाजार आवारातील व्यवहार ठप्प आहेत. शेतकऱ्यांचे व माथाडी कामगारांचे नुकसान होऊ नये म्हणून व्यापारी व आडत्यांनी पुर्वप्रथेनुसार अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य माथाडी, ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियन व कामगारांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.