पंचवटी (जि. नाशिक) : नाशिक बाजार समितीच्या १८ जागांसाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी माजी सभापती देवीदास पिंगळे, संपतराव सकाळे, माजी संचालक दिलीपराव थेटे, तसेच माजी नगरसेवक तथा बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्यासह उमेदवारांनी शक्तिप्रदर्शनाने अर्ज दाखल केला.
या वेळी जिल्हाधिकारी कार्यालय कार्यकर्त्यांच्या गर्दीने फुलून गेले होते. या वेळी जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. (Nashik Market Committee Election Applications filled by Pingle Chumble groups nashik news)
आतापर्यंत एकूण २४६ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज दाखल करण्यास चार दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. शुक्रवारी (ता. ३१) माजी खासदार तथा माजी सभापती देवीदास पिंगळे आणि शिवाजी चुंभळे, दिनकर पाटील यांच्या गटातील काही सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले.
या वेळी गटातील मतदार, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. बाजार समिती निवडणुकीत अर्ज दाखल करण्यासाठी गर्दी होत असताना दुसरीकडे, अर्जविक्री मोठी होत आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी (ता. ३) मोठी गर्दी होणार आहे.
"प्रत्येक वेळी झालेल्या निवडणुकीत सभासद पाठीशी राहिले. बाजार समिती ही शेतकऱ्यांच्या मालकीची संस्था आहे. ही संस्था जपण्यासाठी निवडणूक रिंगणात आहे. नाशिक बाजार समितीला जिल्हा बँक होऊ देऊ नका. बाजार समितीत प्रशासक असल्याने शेतकऱ्यांची दोन कोटींची फसवणूक झाल्यानंतरही कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी संस्था वाचविण्याची गरज आहे." - देवीदास पिंगळे, माजी सभापती
"भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन, खासदार हेमंत गोडसे, दिनकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गट आणि भाजपचे सक्षम असे पॅनल राहील. सभापती असताना केलेल्या विकासकामांना सभासद पाठिंबा देतील. तोट्यात असलेली बाजार समिती नफ्यात आणून दाखविली. त्यामुळे पुन्हा एकदा मतदार कौल देतील, असा विश्वास आहे."
- शिवाजी चुंभळे, माजी सभापती
हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
...यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल
माजी खासदार देवीदास पिंगळे यांच्या समवेत दिलीपराव थेटे, संपतराव सकाळे, बहिरू मुळाणे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, खांडेकर, निर्मला कड, रुपांजली माळेकर, संजय तुंगार, राजाराम धनवटे, संदीप पाटील, चंद्रकांत निकम, जगदीश अपसुंदे, युवराज कोठुळे, तसेच माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनीदेखील अर्ज दाखल केला.
अनेकांच्या उंचावल्या भुवया
बाजार समिती निवडणुकीत नाशिक, त्र्यंबक, पेठ अशा एकूण तीन तालुक्यांचे मतदान होत असते. यासाठी माजी व आजी खासदार यांचे गट आमनेसामने असून, शुक्रवारी पिंगळे गटाचे उमेदवार अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित झाले होते.
त्या वेळी आवारात पिंगळे समर्थकांची एकच गर्दी झाली होती. अक्षरशः अर्ज भरण्यासाठी जात असताना माजी खासदार देवीदास पिंगळे व इतर उमेदवार यांच्या अवतीभवती असलेली गर्दी बघताच अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.