Market Committee Election Result : नाशिकमध्ये देवीदास पिंगळेच! ‘आपलं पॅनलचे’ वर्चस्व कायम..

Market Committee nashik
Market Committee nashikesakal
Updated on

Nashik News : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अटीतटीच्या लढतीत माजी सभापती देवीदास पिंगळे यांनी ‘आपलं पॅनलचे’ वर्चस्व कायम राखत बारा जागांवर विजय मिळविला. विरोधी माजी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या शेतकरी पॅनलला सहा जागा मिळाल्या.

तब्बल ११ तास मतमोजणी प्रक्रिया सुरू होती. निवडणूक निर्णय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी विजयी उमेदवारांची घोषणा केली. (Nashik Market Committee result Devidas Pingale apla panel won 12 seats news)

सहकारी संस्था सर्वसाधारण गट (विजयी उमेदवार)ः १) शिवाजी चुंभळे ७५४ ( शेतकरी पॅनल), २) राजाराम धनवटे ६९० (शेतकरी पॅनल), ३) देवीदास पिंगळे ६७६ (आपलं पॅनल), ४) संपत सकाळे ६२१ (आपलं पॅनल), ५) युवराज कोठुळे ५९८ (आपलं पॅनल), ६) तानाजी करंजकर ५९२ (शेतकरी पॅनल) ७) उत्तम खांडबहाले ५७० ( आपलं पॅनल)

ग्रामपंचायत गट (विजयी उमेदवार) ः अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग : भास्कर गावित (आपलं पॅनल ८९४ ), आर्थिक दुर्बल प्रवर्ग : निर्मला विलास कड (आपलं पॅनल ९९९), सर्वसाधारण प्रवर्ग ः विनायक माळेकर (आपलं पॅनल ९९२) आणि जगन्नाथ कटाळे (आपलं पॅनल ९५६)

महिला राखीव गट ः कल्पना चुंभळे (शेतकरी पॅनल) ७१४, सविता तुंगार (आपलं पॅनल) ६१३. भटक्या विमुक्त जाती- जमाती : प्रल्हाद काकड (शेतकरी पॅनल) ७०१, इतर मागास वर्ग ः धनाजी पाटील (शेतकरी पॅनल) ६१३.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Market Committee nashik
Market Committee Election Result : मालेगावात नव्या नेतृत्वाला संधी

सर्वसाधरण प्रवर्ग पराभूत उमेदवार

उत्तम आहेर ४१५ (आपलं पॅनल), गणेश चव्हाण ४९९ ( शेतकरी पॅनल), अनिल ढिकले १४ (अपक्ष), गोकुळ पिंगळे २७२ (अपक्ष), तुकाराम पेखळे ५१४ (आपलं पॅनल), पोपट पेखळे ११ (अपक्ष), नामदेव बुरंगे ४०७ ( शेतकरी पॅनल), प्रभाकर माळोदे ५५९ ( शेतकरी पॅनल), बहिरू मुळाने ४७६ (आपलं पॅनल), शिवाजी मेढे ४५७ (शेतकरी पॅनल), दिनकर साळवे ११ (अपक्ष).

ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल ः सदानंद नवले (शेतकरी पॅनल) ८१९. अनुसूचित जाती ः यमुना जाधव (शेतकरी पॅनल) ६५०, अलका झोंबाड (अपक्ष) २४१. सर्व. ग्रामपंचायत ः तानाजी गायकर (शेतकरी पॅनल) ८९५, सोमनाथ जाधव (अपक्ष) १९.

Market Committee nashik
Bazar Samiti Result : चांदवड बाजार समितीवर ‘लोकामान्य’ चे वर्चस्व

राजाराम धात्रक (अपक्ष)११, प्रकाश भोये (शेतकरी पॅनल) ६७८. महिला राखीव ः विजया कांडेकर (आपलं पॅनल) ५३३, शोभा माळोदे (शेतकरी पॅनल) ५५६. भटके विमुक्त : विश्वास नागरे (आपलं पॅनल) ५२१ , तर मागास प्रवर्ग : दिलीप थेटे (आपलं पॅनल) ६१२.

"नाशिक बाजार समितीमध्ये मतदारांनी मला सहा वेळेस निवडून देऊन माझ्यावर विश्वास टाकला आहे. माझ्या ज्या सहकाऱ्यांचा पराभव झाला आहे, त्यामागे विरोधकांचे षडयंत्र आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मतदारांना विरोधकांनी धमकावत मतदान करवून घेतले आहे. त्यामुळे आपल्या सहकाऱ्यांचा पराभव झाला." - देवीदास पिंगळे, आपलं पॅनलचे नेते

"भ्रष्टाचाराच्या पैशांपुढे आमच्या पॅनलचा पराभव झाला, हे मान्य आहे. मात्र गत पंचवार्षिकपेक्षा यंदा मतदारांनी आमच्यावर भरभरून प्रेम केले असून, सर्वाधिक मते आमच्या पदरात टाकली आहेत. पिंगळे यांना चार नंबरची मते पडली असून, हा त्यांचा पराभव आहे." - शिवाजी चुंभळे, शेतकरी विकास पॅनल नेते

Market Committee nashik
Market Committee Election Result : पिंपळगावला राष्ट्रवादीचाच गजर; यतीन कदमांचा झाला प्रवेश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.