पिंपळगाव बसवंत : शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने शालेय साहित्य खरेदीच्या गर्दीने बाजारपेठ गजबजली आहे. शालेय साहित्याच्या दरात यंदा वाढ झाली नाही. वह्यांचे भाव दहा ते पंधरा टक्क्यांनी उतरल्याने पालकांना दिलासा असल्याचे चित्र आहे. राज्यात १५ जूनपासून शाळा सुरू होणार आहेत. पिंपळगावच्या निफाड फाटा परिसरातील बाजारपेठेत पालक, विद्यार्थी शालेय साहित्य खरेदीला बाहेर पडले होते. (market is crowded with people buying school supplies)
शालेय साहित्याचे मागील वर्षाचे दर यंदा कायम असल्याने पालकांची चिंता कमी झाली आहे. शालेय साहित्याचे विक्रेते भटेवरा म्हणाले, कागदाचे दर कमी झाल्याने वह्यांचे दहा ते पंधरा टक्क्यांनी कमी झाले. इतर शालेय साहित्याचे भाव स्थिर आहेत. शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी पालकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढू लागला आहे.
स्कूल बॅग, टिफिन, छत्री, पाण्याची बाटली अशा सगळ्याच साहित्यासाठी उत्साह आहे. काही शाळा या वस्तू देतात तर अनेक शाळा बाजारातून शालेय साहित्य खरेदी करा, असे पालकांना सांगतात. त्यामुळे बाजारात शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी सध्या गर्दी वाढू लागली आहे.
पहिलीचे पॅकेज बाराशे रुपयांत
पहिलीचे शालेय साहित्य खरेदीसाठी मागील वर्षी एक हजार पाचशे रुपये खर्च करावे लागत होते. यंदा वह्यांचे भाव उतरल्याने बाराशे रुपयांत उपलब्ध आहे. त्यात स्कूल बॅग, कंपास, पाऊच, चार पुस्तके, पेन्सिल, पेन, एक डझन वह्यांचा समावेश आहे. कार्टून चित्र असलेल्या वह्यांना यंदाही जास्त प्रतिसाद आहे, असे शालेय साहित्याचे विक्रेते ऋषी राठी यांनी सांगितले. (latest marathi news)
'बालभारती'ची पुस्तके उपलब्ध
'बालभारती'ची इयत्ता पहिली ती आठवी पर्यंतची पाठ्यपुस्तके ही बहुतांश विद्यार्थ्यांना शाळेत मोफत उपलब्ध होतात. त्यामुळे पहिली ते आठवीची पाठ्यपुस्तके विकत घेण्याचे प्रमाण कमी आहे. नववी ते बारावीची पाठ्यपुस्तके विकत घ्यावी लागतात. त्यांनाही प्रतिसाद आहे.
असे आहेत दर
*स्कूल बॅग : ४०० ते २,५००
*पाऊच :४० ते ३५०
*छत्री : १५० ते ५००
*टिफिन :११० ते १०००
*टिफिन बॅग : १२० ते २५०
*वही (एक डझन) :१५० ते ४५०
*रजिस्टर (एक डझन) ३०० ते ८००
*पाण्याची बाटली : ४० ते ६००
*रेनकोट : २०० ते ७००
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.