Nashik Vegetable Rate Hike : गेल्या तीन दिवसांपासून शहर परिसरात पाऊस सुरू असून वातावरणात बदल झाला आहे. फळभाज्यांमध्ये कारली, वांगे आदी फळभाज्यांची आवक घटल्याने बाजारभाव वधारले आहेत. पावसामुळे रविवारी (ता.४) आवक घटून पालेभाज्या १५ ते २० टक्क्यांवर आली, त्यामुळे प्रतवारीनुसार बाजारभाव मिळाला. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत सद्यस्थितीत नाशिक, सिन्नर, दिंडोरी, पिंपळगाव, त्र्यंबकेश्वर आदी भागांतून पालेभाज्या व फळभाज्या येत आहेत. ()
बाजार समितीत खरेदी केलेला शेतमाल हा मुंबई, गुजरात अहमदाबादकडे पाठविला जातो. काही प्रमाणात स्थानिक विक्रीसाठी व्यापारी खरेदी करतात. पाले व फळभाज्यांची आवक सद्यस्थितीत सुमारे वीस ते तीस टक्क्यांवर आली आहे. यामुळे दर वधारले असून स्थानिक पातळीवर होणारी विक्री किंमत परिणामी वाढली आहे.
बाजार समितीत रविवारी (ता.४) झालेल्या लिलावात काकडी १० ते २५ रुपये, दुधी भोपळा १० ते २० रुपये, गिलके ४५ ते ५० रुपये, कारले २५ ते ४० रुपये, दोडका ४५ ते ६५ रुपये, शिमला मिरची ३५ ते ५० रुपये, हिरवी मिरची ३५ ते ४५ रुपये, वाल ५० ते ६५ रुपये, गवार ४५ ते ६० रुपये, घेवडा ६५ ते ७५ रुपये, गाजर २० ते ३० रुपये, वांगी ४५ ते ६० रुपये, भेंडी २५ ते ३५ रुपये प्रति किलो असे दर होते. (latest marathi news)
किरकोळ विक्रेत्यांकडे हेच दर प्रतिकिलो तीस ते चाळीस रुपये वाढीव असतात. बाजार समितीत रविवारी (ता.४) झालेल्या लिलावात सायंकाळी गावठी कोथिंबीर २ ते ७५ रुपये जुडी, चायना कोथिंबीर १ ते ८० रुपये जुडी, मेथी ५ ते ५० रुपये जुडी, शेपू १० ते ३७ रुपये जुडी, कांदापात २० ते ५० रुपये प्रति जुडीला भाव मिळाला. तेच किरकोळ बाजारात कोथिंबीर, मेथी, शेपू, कांदापात यांची जुडी छोटी करून दुप्पट दराने विक्री होत आहे.
प्रतवारीनुसार दर
नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून चांगलाच पाऊस सुरू आहे. या पावसामुळे बऱ्याचशा पालेभाज्या या भिजल्या जातात. या पालेभाज्यांना प्रतवारीनुसार बाजारभाव मिळतो. मात्र, यात भिजलेल्या पालेभाज्यांना दर कमी मिळत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.