Nashik News : नियोजनशून्य कामांमुळे बाजारपेठ ठप्प! समस्यांमुळे व्यावसायिकांची नाराजी

Nashik News : स्मार्टसिटीच्या नियोजनशून्य कामांमुळे मेन रोड, शालिमार मुख्य बाजारपेठ ठप्प झाली आहे.
Difficulty created by digging both sides of the road at Main Road.
Difficulty created by digging both sides of the road at Main Road. esakal
Updated on

जुने नाशिक : स्मार्टसिटीच्या नियोजनशून्य कामांमुळे मेन रोड, शालिमार मुख्य बाजारपेठ ठप्प झाली आहे. व्यावसायिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. आर्थिक नुकसानही सहन करावे लागत असल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

मेनरोड, शालिमार मुख्य बाजारपेठेत रस्ते खोदून पाइपलाइन टाकण्याचे कामे सुरू आहेत. विशेष म्हणजे याबाबतचे नियोजन नाही. एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला खोदकाम करून पाइपलाइन टाकली जात आहे. (Nashik market stalled due to unplanned work Professionals upset by problems marathi news)

खोदलेल्या रस्त्याचा मलबा त्याच ठिकाणी पडून राहत आहे. त्यामुळे रस्ता अरुंद होत आहे. वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे. खोदकाम सुरू असल्याने धूळ हवेत पसरत आहे. त्यामुळे होणारे नुकसान लक्षात घेता व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवावे लागत आहे.

मंगळवारी (ता. १२) येथील अनेक व्यावसायिकांनी दुकाने बंद ठेवले. त्याचप्रमाणे दुकानात जाण्यासाठी ग्राहकांना अडचण निर्माण होत आहे. व्यावसायिकांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय राहत नाही. रस्त्यावर फेरीवाल्यांच्या माध्यमातून दुकाने लावून व्यवसाय करणाऱ्या लहान- मोठ्या व्यावसायिकांनाही दुकाने बंद ठेवल्याने उपासमारीची समस्या निर्माण होत आहे.

कामे करताना प्रथम एका भागाचे काम पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या भागाचे काम करणे अनिवार्य आहे. जेणेकरून ज्या भागाचे काम सुरू आहे. त्याच्या विरुद्ध भागातील व्यवसायिकांना व्यवसाय करण्यात अडचण निर्माण होणार नाही. नियोजनशून्य कामामुळे एकाच वेळी दोन्ही भागांचे काम केले जात असल्याने दोन्ही बाजूच्या व्यवसायिकांना अडचण सहन करावी लागत आहे.

व्यावसायिकांसह खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ७ एप्रिलपर्यंत येथील कामे पूर्ण करण्याची मुदत आहे. मुदतीत काम व्हावे. यासाठी एकच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूने कामे सुरू आहे. कामगारांकडून व्यावसायिकांना सांगण्यात आले.  (latest marathi news)

Difficulty created by digging both sides of the road at Main Road.
Jal Jeevan Mission : शाश्वत पाणीपुरवठासाठी कर वसुली गरजेची : डॉ. अर्जुन गुंडे

रस्त्यास अडथळा

मेनरोड रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करून व्यावसायिक आणि नागरिकांसाठी अडचण निर्माण करण्यात आली आहे. यावरच स्मार्टसिटीचे काम थांबले नाही, तर गाडगे महाराज पुतळा येथे भररस्त्यात मिनी रोड रोलर उभा करून आजूबाजूला बॅरेकट लावून अडचण निर्माण करण्याचा अजब प्रकारही करण्यात आला आहे.

"मुदतीत काम पूर्ण होण्यासाठी एकाच वेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकानांसमोर खोदकाम केले आहे. व्यवसायिकांना वेठीस धरण्याचे काम सुरू आहे. नियोजनशून्य कामामुळे बाजारपेठ ठप्प झाली आहे."- लक्ष्मीकांत तांबोळी, व्यावसायिक

Difficulty created by digging both sides of the road at Main Road.
Nashik News : अनिवासी मालमत्ता धारकांसह नाशिककरांना दिलासा! वाढीव मिळकत करांचे फेरमूल्यांकन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.