Nashik MD Drug Case: ड्रग्जमाफिया अक्षयला भोपाळमधून अटक

Police team taking Akshay Naikwade from Bhopal and bringing him to Nashik.
Police team taking Akshay Naikwade from Bhopal and bringing him to Nashik. esakal
Updated on

Nashik MD Drug Case : सामनगाव येथील अमली पदार्थ प्रकरणातील संशयित अक्षय गणेश नाईकवाडे यास नाशिकच्या गुंडविरोधी पथकाने मध्य प्रदेशातील भोपाळ येथून ताब्यात घेतले.

त्यामुळे या गुन्ह्यातील महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Nashik MD Drug Case Drug mafia Akshay arrested from Bhopal news)

नाशिक रोड पोलिसांनी दोन महिन्यांपूर्वी सामनगाव येथील गणेश शर्मा यांच्याकडून अमली पदार्थ जप्त केले होते. त्यानंतर पथकाने सापळा रचून या गुन्ह्यात दहापेक्षा अधिक संशयितांची धरपकड केली. सोलापूर येथे उभारलेला कारखाना, गुदामही पोलिसांनी उद्‍ध्वस्त करत एमडी, कच्चा माल आदी यंत्रसामग्री असा कोट्यवधींचा मुद्देमाल पकडला.

या गुन्ह्याची व्याप्ती थेट पुण्यापर्यंत पोचलेली असताना नाशिकच्या पोलिसांनी भोपाळमधून मुख्य संशयितापैकी एक असलेल्या अक्षय नाईकवाडे यास ताब्यात घेतले. तीन महिन्यांपासून तो गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्ली, उत्तराखंड या राज्यांमध्ये फिरत होता.

Police team taking Akshay Naikwade from Bhopal and bringing him to Nashik.
Nashik MD Drug Case: शिंदेगावातील कारखान्याला भिवंडी, नवी मुंबईतून रसायनाचा पुरवठा; पोलीस चौकशीतून समोर

गुंडगिरीविरोधी पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांना गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांनी नाईकवाडे याला पकडण्याची सूचना केली.

त्यानुसार पथकातील अंमलदार प्रदीप ठाकरे यांनी नाईकवाडेचे भोपाळमधील लोकेशन शोधले. पोलिसांनी सापळा रचत शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यास नाशिक रोड पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस नाईक प्रदीप ठाकरे, अक्षय गांगुर्डे, गणेश भागवत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Police team taking Akshay Naikwade from Bhopal and bringing him to Nashik.
Nashik MD Drug Case: भूषण पाटील, बलकवडेला बुधवारपर्यंत पोलिस कोठडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.