नाशिक : गेल्या वर्षी वडाळागावात छोटी भाभी उर्फ नसरिण शेख हिचा एमडी ड्रगजाचा अड्डा उदधवस्त केला होता. याचप्रकरणात संबंध असल्याने शहर गुन्हेशाखेने अटक केलेल्या संशयित चिपड्या उर्फ इरफान नूर मोहम्मद शेख (३०, रा सादिकनगर, वडाळागाव) याच्या पोलीस कोठडीत आणखी एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे. त्यास बुधवारी (ता. २) रात्री वडाळागावातून अटक केली आहे. ( Increased in police custody of Chipdya )
संशयित चिपड्याची राजकीय नेत्यांशी जवळीक असल्यानेच त्याच्यावर कारवाई होत नसल्याचे आरोप यापूर्वी झाले होते. गेल्या वर्षी मुंबई पोलिसांनी शिंदे गावात एमडी माफिया ललित पवार याचा कारखाना उद्ध्वस्त केला. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात नाशिक पोलिसांनी वडाळागावात मध्यरात्री छापा टाकून छोटी भाभी उर्फ नसरीन शेख हिला 54 ग्रॅम एमडीसह अटक केली होती.
याप्रकरणात पोलिसांनी तिचा पती इम्तियाज शेख, वसीम रफिक शेख यांच्यासह ड्रग्ज पेडलर सलमान फलके, शब्बीर उर्फ आयना अब्दुल अजिज मेमन यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर मात्र या गुन्ह्याचा तपास थंडावला होता. वर्षभरानंतर गेल्या बुधवारी (ता.२) रात्री गुन्हेशाखेच्या अंमलीपदार्थविरोधी पथकाने वडाळागावातून चिपड्याला अटक केली होती.
चिपड्याचे एमडी डग्जस विक्री करणार्या छोट्या भाभीशी थेट कनेक्शन होते. त्यांच्यातील संवादाचे तांत्रिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे याशिवायही अनेक राजकीय क्षेत्रातील संबंधितांची नावे या प्रकरणी चर्चेत आहेत. दरम्यान चिपड्याच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यास आज न्यायालयात हजर केले असता त्याच्या कोठडीत एका दिवसाची वाढ करण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.