Nashik MD Drug Case: एमडीचा नाशिकमधील सूत्रधार ‘अर्जून’च! रॅकेट उदध्वस्त करण्यासाठी पोलिसांचे धाडसत्र

MD drugs crime
MD drugs crimeesakal
Updated on

Nashik MD Drug Case : कोट्यवधींचे एमडी ड्रग्ज नाशिकमध्ये सापडल्याने ड्रग्ज माफियाचे केंद्रबिंदू नाशिक होऊ पाहते आहे.

परंतु आत्तापर्यंतच्या पोलिस तपासातून नाशिकमध्ये ड्रग्जची फॅक्टरी असली तरी, एमडी ड्रग्ज व्हाया मुंबई नाशिकला आले आणि त्याचा सूत्रधार सराईत गुन्हेगार अर्जून पिवाळ असल्याचे समोर येते आहे. (Nashik MD Drug Case mastermind in Nashik Arjun piwal Police raids to bust rackets Crime)

शहरातील एमडी ड्रग्जचे रॅकेट उदध्वस्त करण्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून धाडसत्र सुरू केले आहे. यातून लवकरच महत्त्वाची धागेदोरे पोलिसांच्या हाती लागणार असल्याचे संकेत आहेत

सामनगाव येथील एमडी ड्रग्ज प्रकरणी नाशिक पोलिसांनी अटक केलेल्या अर्जून पिवाल यांच्यासह सनी पगारे, सुमित पगार, मनोज गांगुर्डे या चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांची पथके ठाणे-मुंबईपर्यंत संशयिताचा माग काढत पोहोचले आहेत. पिवालच्या अटकेमुळेच पोलिसांनी मुंब्रातून भूषण उर्फ राजा गणपत मोरे (३६, रा. ठाणे) यास अटक केली आहे.

पिवाल त्याच्याकडून एमडी ड्रग्ज आणून नाशिकमध्ये रॅकेट चालवत असल्याचे तपासातून समोर आले आहे. त्यामुळे नाशिक अंमली पदार्थ विरोधी पथकासह शहर गुन्हेशाखेच्या पथकांकडून एमडीचे रॅकेट उदध्वस्त करण्यासाठी शहरात काही संशयितांच्या घरावर धाडसत्र राबविले आहे. यातून पोलिसांच्या हाती काही लागल्याचे समजते.

MD drugs crime
Lalit Patil Drug Case: MD ड्रग्जचा प्रवास मुंबई व्हाया नाशिकमध्ये! सामनगाव गुन्ह्यात आणखी एकाला मुंबईतून अटक

पिवालचे शहरात रॅकेट

सामनगाव एमडी प्रकरणातील पिवाल, पगारे बंधू व गांगुर्डे हे चौघेही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. कोरोनापूर्वी पिवाळ हा नाशिकरोडच्या मध्यवर्ती कारागृहात असताना एमडी ड्रग्ज तस्करीतील संशयितांच्या तो संपर्कात आला होता.

कारागृहाबाहेर आल्यावर पिवाल याने मुंबईतील एमडी ड्रग्ज रॅकेटशी संधान साधले आणि नाशिकमध्ये आणून रॅकेट चालविणे सुरू केले होते.

२०१९च्या दरम्यानच ललित पाटील (पानपाटील) हादेखील एमडी ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात आला आणि त्याने चाकणमधून तस्करी सुरू केली होती. मात्र आत्तापर्यंतच्या तपासात ललितने नाशिकमध्ये एमडीची विक्री केल्याचे वा रॅकेट सुरू केल्याचे समोर आलेले नाही.

परंतु नाशिकमध्ये अर्जून पिवाल यानेच एमडीचा बाजार सुरू केला. त्याच्याकडूनच विक्री सुरू होती. या रॅकेटचा पोलखोल करण्यासाठी शहर पोलिसांकडून कसून धाडसत्र राबविले जात असून, काहीप्रमाणात साठा हातीही लागल्याचे समजते

MD drugs crime
Chh. Sambhajinagar Drug Case : वाळूजमधील कंपनीत व्हायची ड्रग्ज निर्मिती

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.