Nashik News : वैद्यकीय महाविद्यालये ठरतील नागरिकांसाठी सेवा केंद्र : PM मोदी; शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन

Latest Nashik News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालये भविष्यात सभोवतालच्‍या क्षेत्रातील लाखो लोकांच्‍या सेवेचे केंद्रे ठरतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. ९) व्‍यक्‍त केला.
Prime Minister Narendra Modi speaking on the occasion of the inauguration of the Government Medical College and Hospital through television system.
Prime Minister Narendra Modi speaking on the occasion of the inauguration of the Government Medical College and Hospital through television system.esakal
Updated on

Nashik News : राज्‍यातील युवकांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्‍ध करून दिली आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्‍या जागांमध्ये वाढ करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्‍ध केली जात आहे. लाखो लोकांचे जीवन चांगले बनविण्याचा हा महायज्ञ आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये भविष्यात सभोवतालच्‍या क्षेत्रातील लाखो लोकांच्‍या सेवेचे केंद्रे ठरतील, असा विश्‍वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (ता. ९) व्‍यक्‍त केला. (PM Modi Inauguration of Government Medical Colleges)

नाशिकसह राज्‍यातील एकूण दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या हस्‍ते दृकश्राव्‍य पद्धतीतून झाले. त्या वेळी ते बोलत होते. नाशिकच्‍या वैद्यकीय महाविद्यालय उद्‌घाटनाचा कार्यक्रम महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्‍या सभागृहात झाला.

पालकमंत्री दादा भुसे, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ, खासदार डॉ. शोभा बच्छाव, भास्कर भगरे, आमदार ॲड. राहुल ढिकले, जिल्हाधिकारी जलज शर्मा, महापालिका आयुक्त डॉ. अशोक करंजकर, महाराष्ट्र आरोग्‍य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल (निवृत्त) डॉ. माधुरी कानिटकर आदी उपस्थित होते. ऑनलाइन पद्धतीने राज्‍यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आदी सहभागी झाले होते.

पंतप्रधान मोदी म्‍हणाले, की देशात वैद्यकीय महाविद्यालयाच्‍या ७५ हजार जागा उपलब्‍ध करण्याचे उद्दिष्ट असून, नव्‍याने सुरू झालेली महाविद्यालये यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतील. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की आगामी काळात महाराष्ट्र वैद्यकीय क्षेत्रात प्रथम क्रमांकाचे राज्य बनेल. समाजातील अंतिम व्‍यक्‍तीपर्यंत आरोग्‍य सुविधा पोहोचविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालये महत्त्वाची भूमिका बजावतील.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्‍हणाले, की एकाच दिवशी दहा वैद्यकीय महाविद्यालयांच्या उद्‌घाटनाची ही घटना ऐतिहासिक आहे. वाढीव जागा उपलब्‍ध झाल्‍याने विद्यार्थ्यांचे वैद्यकीय शिक्षणाचे स्‍वप्‍न पूर्ण होईल. व्‍यासपीठीय कार्यक्रमात पालकमंत्री भुसे म्‍हणाले, की नाशिकच्या विकासाच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल.

सध्या ५० जागांना मंजुरी मिळाली असली, तरी आणखी ५० जागा वाढविण्यासाठी प्रयत्‍न केले जाणार आहेत. कुलगुरू डॉ. कानिटकर म्‍हणाल्‍या, की १५ ऑक्‍टोबरला पहिल्‍या बॅचच्या विद्यार्थ्यांच्‍या अध्ययनाला सुरुवात होईल. महाविद्यालयाच्‍या उद्‌घाटनातून नाशिककरांचे स्‍वप्‍न साकार झाले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोनशिलेचे अनावरणही या वेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. (latest marathi news)

Prime Minister Narendra Modi speaking on the occasion of the inauguration of the Government Medical College and Hospital through television system.
Akola : निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला भगदाड,माजी आमदार खतीब यांचा ‘वंचित’मध्ये प्रवेश, बाळापूरात ‘सेना-वंचित’ लढत

एका रांगेत सर्वपक्षीय नेते

कार्यक्रमानिमित्त सत्ताधारी, विरोधी अशा सर्वच पक्षांचे नेते एका रांगेत बसल्‍याचे दृश्‍य या वेळी बघायला मिळाले. कुलगुरू डॉ. कानिटकर यांच्‍याशेजारी काँग्रेसच्‍या खासदार डॉ. शोभा बच्‍छाव बसल्‍या होत्‍या. त्‍यांच्‍याशेजारीच मंत्री भुजबळ, नंतर शिवसेनेचे मंत्री दादा भुसे, पुढे भाजपचे आमदार ॲड. राहुल ढिकले बसले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे खासदार भास्‍कर भगरे उशिराने आल्‍याने ते पहिल्‍या रांगेत बसले होते. मात्र, इतर मान्‍यवरांपासून दूर बसले होते. शिवसेना (उबाठा) पक्षाचे कुणी प्रतिनिधी समारंभात नव्‍हते.

रंगीत तालमीचे मनोरंजन, तांत्रिक अडचणींचा व्‍यत्‍यय

पंतप्रधान मोदी मार्गदर्शन करणार, म्‍हणून केंद्रिभूत यंत्रणेकडून राज्‍यातील सर्व ठिकाणच्‍या सहभागींना सूचना दिल्‍या जात होत्या. मात्र कार्यक्रमापूर्वीची रंगीत तालीम उपस्‍थितांसाठी मनोरंजनाचा विषय ठरली होती. कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी स्‍क्रीनबाबत काही तांत्रिक अडचणी व्‍यत्‍यय आणत होत्‍या. काही मिनिटांसाठी प्रोजेक्‍टरचा आधार घ्यावा लागला. मात्र, नंतरचा कार्यक्रम स्‍क्रीनवर सुरळीत पार पडला.

Prime Minister Narendra Modi speaking on the occasion of the inauguration of the Government Medical College and Hospital through television system.
Nashik News : नाशिक, मालेगावला स्वतंत्र अपर तहसील कार्यालय! महसूल मंडळांचे विभाजन, 4 कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.