नाशिक : वैद्यकीय विभागाला कोरोनाचा विळखा

महापालिकेचे पाच डॉक्टर बाधित
Corona New variant
Corona New variantsakal
Updated on

नाशिक : शहरात आज तब्बल साडेआठशे कोरोनाबाधित (Corona interrupted) आढळल्याने वैद्यकीय यंत्रणा हादरली असतानाच त्यात भर पडली ती रुग्णांवर उपचार करणाऱ्या पाच डॉक्टरांची. कोरोना (Corona) नियंत्रणात आणण्याबरोबरच वैद्यकीय (Medical) सेवा पुरविण्याची जबाबदारी असलेल्या बिटको, डॉ. झाकिर हुसेन व मोरवाडी रुग्णालयातील पाच डॉक्टर पॉझिटिव्ह (Doctor positive) आढळले. (Nashik Municipal Corporation)

Corona New variant
ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

शहरात कोरोना तिसऱ्या लाटेला (Corona third wave) सुरवात झाल्याचे आजच्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. गेल्या सहा ते सात महिन्यातील सर्वाधिक आठशेच्या पुढे एकाच दिवशी कोरोना बाधितांचा आकडा बाहेर पडल्याने वैद्यकीय यंत्रणा हादरली आहे. त्याचबरोबर ओमिक्रॉनचा एक व डेल्टा व्हेरीएंटचे रुग्ण आढळून येत असल्याने चिंतेत अधिकच भर पडली आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी वैद्यकीय विभागाने कंबर कसली असताना शुक्रवारी (ता. ७) या वैद्यकीय विभागावरच कोरोनाने हल्ला केल्याचे दिसून आले. वैद्यकीय सेवा देणारे पाच डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले. नाशिक रोड येथील बिटको रुग्णालय, कठडा येथील डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात प्रत्येकी दोन व मोरवाडी रुग्णालया एक, अशा पाच डॉक्टरांना कोरोना लागण झाली. कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या एक नोडल अधिकाऱ्याचा यात समावेश आहे.

Corona New variant
राज्यातील रुग्णसंख्या वाढली! काल दिवसभरात 40 हजारच्या पार

वैद्यकीय विभागात कोरोनाने एन्ट्री केल्याने भीती निर्माण झाली आहे. पाचही डॉक्टरांना सौम्य लक्षणे असल्याने गृहविलगीकरणात ठेवण्यात आले. दरम्यान, संपर्कात आलेल्या रुग्ण व कर्मचाऱ्यांचे स्वॅब अहवालांची चाचणी केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.