Nashik Civil Hospital : मनपा रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष; वैद्यकीय अधीक्षक डॉ. चव्हाण यांची माहिती

Civil Hospital : शहर व परिसराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचत असल्याने महापालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहे.
summer heat
summer heat esakal
Updated on

Nashik Civil Hospital : शहर व परिसराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअसपर्यंत पोचत असल्याने महापालिकेने रुग्णालयांमध्ये स्वतंत्र उष्माघात कक्ष सुरू केले आहे. यामध्ये नाशिक रोड येथील बिटको रुग्णालयात १२, तर उर्वरित चार रुग्णालयांमध्ये प्रत्येकी चार असे एकूण २८ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. तानाजी चव्हाण यांनी दिली. (Nashik Medical Superintendent Dr Chavan information Separate heat ward in municipal hospitals marathi news )

शहरामध्ये तीन दिवसांपूर्वी ३८.९ अंश सेल्सिअस तापमान पोचले होते. आताही ३७ ते ३८ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान स्थिर आहे. मे महिन्यात उन्हाचा चटका अधिक वाढणार आहे. त्यामुळे महापालिकेकडून शासनाच्या सूचनेनुसार उष्माघाताचे बेड तयार राखण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नाशिक रोड येथील ठाकरे रुग्णालयामध्ये १२ उष्माघाताचे बेड आरक्षित करण्यात आले आहे. डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात चार, मोरवाडी येथील स्वामी समर्थ रुग्णालयात चार, पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालय चार, तर मायको रुग्णालयामध्ये चार असे एकूण २८ बेडची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

उष्माघाताची कारणे-

- तीव्र उन्हात शारीरिक श्रमाची, अंग मेहनतीची व कष्टाची कामे.

- कारखान्याच्या बॉयलर रूममध्ये काम करणे.

- काच कारखान्यात काम करणे.

- जास्त तापमानाच्या खोलीमध्ये काम करणे.

- घट्ट कपड्यांचा वापर.  (latest marathi news)

summer heat
Nashik Civil Hospital : अनागोंदी, अस्वच्छता, औषधांचा तुटवडा, हलगर्जीपणामुळे जिल्हा रुग्णालय चर्चेत

लक्षणे

- मळमळ, उलटी, हात-पायांत गोळे येणे, थकवा येणे, ४० डिग्री सेल्सअसपेक्षा जास्त ताप येणे, त्वचा गरम होणे व कोरडी पडणे. क्वचित लाल होणे, घाम न येणे, डिहायड्रेशन, चक्कर येणे, निरुत्साही वाटणे, डोके दुखणे, छातीत धडधड होणे, रक्तदाब वाढणे. मानसिक बेचैनी, अस्वस्थता, बेशुद्धावस्था.

प्रतिबंधक उपाय

*वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे करणे टाळावे व शक्य नसल्यास थोड्या वेळाने सावलीत विश्रांती घेऊन पुन्हा काम करावे

* कष्टाची कामे सकाळी लवकर अथवा संध्याकाळी कमी तापमान असताना करावीत. काळ्या किंवा भडक रंगाचे कपडे वापरू नयेत.

*सैल, पांढऱ्या किंवा फिक्कट रंगाचे सुती कपड्यांचा वापर करावा. उन्हात बाहेर जाणे टाळावे, प्रवासात जाताना पाणी सोबत ठेवावे.

summer heat
Civil Hospital : जिल्हा रुग्णालयात तब्बल 641 पदांचा बॅकलॉग; प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापकांची 62 पदे रिक्त

*पाणी भरपूर प्यावे. डिहायड्रेशन होऊ देऊ नये, गरज पडल्यास जलसंजीवनीचा वापर करावा. लिंबू सरबत, लस्सी, ताक, नारळ पाणी प्यावे.

* उन्हात गॉगल, डोक्यावर टोपी, टॉवेल, फेटा, छत्रीचा वापर करावा. घरात कुलर, एअर कंडिशनर्स, वाळ्याचे पडदे वापरावे.

उपचार

रुग्णास सावलीत आणावे, रुग्णाचे कपडे सैल करून त्वरित अंग थंड पाण्याने शरीराचे तापमान कमी होईपर्यंत पुसत राहावे. रुग्णास हवेशीर व थंड खोलीत ठेवावे, खोलीतील पंखे, कुलर, एअर कंडिशनर्स त्वरित चालू करावे. रुग्ण शुद्धीवर आल्यास त्यास थंड पाणी, जलसंजीवनी द्यावे व डिहायड्रेशन टाळावे, चहा, कॉफी देऊ नये. रुग्णाच्या काखेखाली आइसपॅक ठेवावेत. रुग्णाच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्या ठेवाव्या. शरीराचे तापमान ३६.८ सेल्सिअस तापमान होईपर्यंत उपचार सुरू ठेवावे.

summer heat
Nashik Civil Hospital: औषध पुरवठादाराला केले ‘ब्लॅक लिस्ट’! जिल्हा शल्यचिकित्सकांचा दणका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.