Nashik PESA Hunger Strike : तोडगा नाहीच, बैठकीचे आश्वासन! उपोषणकर्ते-आदिवासी विकासमंत्री यांच्यातील बैठक निष्फळ

PESA Hunger Strike : बेमुदत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांसमवेत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी बुधवारी चर्चा करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला.
A meeting between Tribal Development Minister Vijay Kumar Gavit and the hunger strikers at the Tribal Commissionerate
A meeting between Tribal Development Minister Vijay Kumar Gavit and the hunger strikers at the Tribal Commissionerateesakal
Updated on

Nashik PESA Hunger Strike : न्यायालयाच्या अंतिम निर्णयाला अनुसरून पेसा क्षेत्रातील पात्रताधारकांना नियुक्ती मिळावी, या मागणीसाठी आदिवासी विकास भवनासमोर बेमुदत उपोषणास बसलेल्या उपोषणकर्त्यांसमवेत आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याशी बुधवारी चर्चा करत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास आयुक्त कार्यालयात बंद दरवाजाआड बैठक झाली. मात्र, ही बैठक निष्फळ ठरली. आदिवासींच्या मागण्यांबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शुक्रवारी (ता. ३०) शिष्टमंडळाची बैठक घेण्यात येणार असून, त्यावर तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन मंत्री डॉ. गावित यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. (meeting between pesa hunger strikers and tribal development minister was pointless )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.