Nashik Uday Samant : उद्योजकांकडून सात वर्षांत कुणी ‘खोके’ घेतले? उद्योगमंत्री उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे, संजय राऊतांवर निशाणा

Nashik News : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे सोमवारी (ता. १३) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे नाशिकमधील उद्योजक व व्यापाऱ्यांची बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
Uday Samant
Uday Samantesakal
Updated on

Nashik News : महाविकास आघाडीच्या सरकारमधून बाहेर पडल्यावर आमच्यावर ‘५० खोके’ घेतल्याचा आरोप काही लोकांकडून करण्यात आला. पण, महायुतीचे सरकार येण्यापूर्वी सात वर्षांत महाराष्ट्रातील उद्योजकांकडून कुणी किती खोके घेतले, याची इत्यंभूत माहिती आपल्याकडे आहे. पण, आम्ही महाराष्ट्राची संस्कृती जोपासतो म्हणून खालच्या थराचे आरोप करीत नाही. (Nashik meeting of entrepreneurs and traders)

खासगीत भेटल्यास सर्व खोक्यांचा हिशेब देऊ, असा इशारा देत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उद्धव ठाकरे व खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरतर्फे सोमवारी (ता. १३) हॉटेल एक्स्प्रेस इन येथे नाशिकमधील उद्योजक व व्यापाऱ्यांची बैठक उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी अध्यक्षस्थानी होते. शाखा चेअरमन संजय सोनवणे व दत्ता भालेराव यांनी सूत्रसंचालन केले. वरिष्ठ उपाध्यक्ष अनिलकुमार लोढा यांनी आभार मानले. या वेळी महाराष्ट्र चेंबरचे उपाध्यक्ष नितीन बंग, ‘निमा’चे अध्यक्ष धनंजय बेळे, ‘जितो’चे अध्यक्ष सुबोध शाह, ‘क्रेडाई’चे अध्यक्ष कुणाल पाटील, ‘आयमा’चे अध्यक्ष ललित बूब.

लघुउद्योग भारतीचे अध्यक्ष निखिल तापडिया, योगेश जोशी, नाशिक धान्य घाऊक किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रफुल्ल संचेती, नाशिक धान्य किरकोळ किराणा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ अमृतकर, नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट्‍स असोसिएशनचे अध्यक्ष नरेश पारख, नाशिक होलसेल क्लॉथ मर्चंट्‍स असोसिएशनचे अध्यक्ष बालकिसन धूत, ‘स्टाइस’चे अध्यक्ष नामकर्ण आवारे.

सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे आदींसह नाशिकमधील सर्व व्यापारी, औद्योगिक संघटनांचे पदाधिकारी व महाराष्ट्र चेंबरच्या कार्यकारिणी समितीचे सदस्य विजय वेदमुथा, हेमंत कांकरिया, संदीप भंडारी, ललित नहार, आशिष नहार, विकास पगारे, कैलास पाटील, रवी जैन उपस्थित होते. धुळे, सिन्नर, कळवण, घोटी, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक रोड येथील उद्योजक, व्यापारी, शेतकरी, पर्यटन व्यावसायिक, सल्लागार व महिला उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. (latest marathi news)

Uday Samant
Nashik News : ड्रग्जप्रकरणातही वैभवची झाली होती चौकशी; कुस्तीपटू लहामगे खून प्रकरण

उद्योगमंत्री सामंत म्हणाले, की ह्युंदाई कंपनी महाराष्ट्राबाहेर जात असल्याचे कळल्यावर आम्ही तातडीने त्यांच्याशी संपर्क साधला. पुण्यात त्यांनी दहा हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. या पद्धतीने उद्योजकांना सर्व सुविधा देणारे हे सरकार असून, त्यांच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे आम्ही नाही.

उद्योजक आणि व्यापारी नाराज राहता कामा नये, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: उद्योजकांचे प्रश्‍न लिहून घेतले. त्यांची सोडवणूक केली जाणार आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्यात ३५ हजार नवउद्योजक घडविले. पण, आमच्यावर सातत्याने ‘खोक्यां’चा आरोप करतात. एकाही उद्योजकाची आम्ही कधी अडवणूक केली नाही. महायुतीच्या सरकारअगोदर सात वर्षे कुणी किती ‘खोके’ उद्योजकांकडून घेतले.

याची संपूर्ण माहिती आपल्याकडे आहे; परंतु खालच्या थराचे आरोप आम्ही करीत नाही, खासगीत भेटले तर ही माहिती देऊ, असा निशाणा त्यांनी ठाकरे व राऊंतावर साधला. स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याची हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती; पण त्यांच्याविरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींच्या बाजूला बसून उद्धव ठाकरे आज आम्हाला शिव्या देत आहेत.

त्यांनी महाराष्ट्राची संस्कृती ‘डायव्हर्ट’ केली, तरी आम्ही संस्कृती व संस्कार सोडणार नसल्याचे सामंत म्हणाले. उद्योजकांचे प्रश्‍न ऐकून घेत त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्‍वासनही सामंत यांनी दिले. या वेळी ‘निमा’चे अध्यक्ष बेळे, उपाध्यक्ष राजेंद्र अहिरे, ‘आयमा’चे अध्यक्ष बूब, उद्योग आघाडीचे अध्यक्ष सतीश कोठारी, मूलभूत सुविधा समितीचे अध्यक्ष कैलास पाटील, प्रमोद वाघ, राजेंद्र फड, अमोल शेळके, आशिष नहार, अनिल लोढा, राजाराम सांगळे आदी उपस्थित होते.

Uday Samant
Nashik News : नाव मागेल त्याला, शेततळ्याला खिशातून पैसे घाला! अनुदानात वाढीची शेतकऱ्यांची मागणी

...हा उद्योजकांचा अपमान

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी (ता. १२) नाशिकमध्ये उद्योजकांशी संवाद साधला. नाशिकमध्ये त्यांचे हेलिकॉप्टरने आगमन झाले, त्या वेळी बॅगा भरून पैसे आणल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी केला आहे. त्यावर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी खुलासा केला.

मुख्यमंत्र्यांवर पैसे वाटपाचा आरोप ‘साडेनऊच्या इव्हेंट’मधून करण्यात आला. उद्योजक पैसे घेऊन मतदान करतात का, हे राऊत यांनी सांगावे. राऊतांचा आरोप म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अवमान नसून, उद्योजकांचा अवमान असल्याचे सामंत म्हणाले. राऊत यांच्याकडून सातत्याने अश्‍लाध्य भाषेचा वापर होत असल्याने महाराष्ट्राची संस्कृती ‘डायव्हर्ट’ केल्याचा आरोपही सामंत यांनी केला.

उदय सामंत म्हणाले

-राज्यातील असंघटित पावणेदोन कोटी कामागारांसाठी महामंडळ

-दहा लाख रिक्षाचालक व दोन लाख टॅक्सीचालकांसाठीही महामंडळ

-‘ह्युंदाई’ची दहा कोटींची गुंतवणूक पुण्यात परत आणली

-उद्योजकांचा आमदार कशाला हवा, आम्ही आहोत ना!

-भारत जोडो यात्रा ज्या राज्यातून गेली, तिथे काँग्रेस पडणार

-राहुल गांधींनी महाराष्ट्रात येऊन स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अवमान केला

-गांधींची भारत जोडो यात्रा फक्त फिटनेस वाढीसाठी

Uday Samant
Nashik BJP News : काँग्रेसला मोठा धक्का! प्रदेश सरचिटणीस डॉ. तुषार शेवाळे यांच्या भाजप प्रवेशाने खळबळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.