NITI Aayog : नीती आयोग समितीची 2 ला नाशिकमध्ये बैठक

NITI Aayog : देशाचे पंचवार्षिक धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या नीती आयोगाची पश्‍चिम विभागीय समितीची बैठक २ ऑगस्टला नाशिकमध्ये होत आहे.
Niti-Aayog
Niti-Aayogesakal
Updated on

NITI Aayog : देशाचे पंचवार्षिक धोरण ठरविण्यात महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या नीती आयोगाची पश्‍चिम विभागीय समितीची बैठक २ ऑगस्टला नाशिकमध्ये होत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने त्यांच्यासह सचिव स्तरावरील सुमारे ८० अधिकारी बैठकीस उपस्थित राहतील. विशेष म्हणजे अशा स्वरूपाची राष्ट्रीय स्तरावरील समिती नाशिकमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ आहे. (meeting of NITI Aayog Committee on 2 august )

गृहमंत्री शहा यांनी राज्यांना सशक्त करण्यासाठी आणि केंद्र व राज्यांमधील धोरणात्मक आराखड्याची अधिक चांगली समज वाढविण्यासाठी सहकारी संघराज्यवादावर भर दिला आहे. त्यांनी तंटे सोडविण्यासाठी आणि सहकारी संघराज्यवादाला चालना देण्यासाठी या झोनल कौन्सिलच्या बैठकीचे आयोजन केले असल्याचे सांगण्यात येते. नाशिकच्या ताज हॉटेल (द गेट वे)मध्ये शुक्रवारी (ता. २) ही बैठक होईल.

बैठकीसाठी जवळपास ८० मुख्य सचिव, प्रधान सचिव उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याच बैठकीचे सूक्ष्मनियोजन विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ करीत आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री, मंत्री, मुख्य सचिव, प्रधान सचिव आणि सदस्य, राज्ये आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. (latest marathi news)

Niti-Aayog
Niti Aayog Meeting : निती आयोगाच्या बैठकीत काय घडलं?, नरेंद्र मोदी काय म्हणाले?

महिला व बालकांवरील लैंगिक गुन्ह्यांचा आणि बलात्काराच्या प्रकरणांचा जलद तपास, बलात्कार आणि पॉक्सो कायद्यातील खटल्यांचा निपटारा करण्यासाठी जलदगती विशेष न्यायालयांच्या (एफटीएससी) योजनेची अंमलबजावणी, तसेच सर्वसामान्यांच्या समस्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. रस्ते जोडणी, वीज, उद्योग आणि इतर बाबींचा समावेश असेल.

प्रत्येक गावात पाच किलोमीटरच्या आत बँका आणि इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखांची सुविधा, पोशन अभियानाद्वारे मुलांमधील कुपोषण दूर करणे, शाळेतील मुलांचे गळतीचे प्रमाण कमी करणे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत सरकारी रुग्णालयांचा सहभाग आणि सर्वसामान्यांच्या हिताचे मुद्दे यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Niti-Aayog
Niti Aayog Poverty: निती आयोगाने दिली खुशखबर! मोदी सरकारच्या काळात गरिबी झाली कमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.