Nashik Teachers Constituency Election : शिर्डीत शिक्षक मतदारसंघासाठी उत्तर महाराष्ट्राची बैठक

Nashik News : नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूकप्रक्रिया लांबणीवर गेल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पुरेसा वेळ मिळणार आहे.
Teachers Constituency Election
Teachers Constituency Electionesakal
Updated on

Nashik News : नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि नगर हा पाच जिल्ह्यांचा आणि ५४ तालुक्यांचा नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूकप्रक्रिया लांबणीवर गेल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीला पुरेसा वेळ मिळणार आहे. निवडणूक आयोगाने नोटिफिकेशन काढल्यामुळे शिक्षक मतदारांना दिलासा मिळाला आहे. (Meeting of North Maharashtra for Teachers Constituency in Shirdi)

निवडणुकीतील प्रमुख संघटना टीडीएफच्या शनिवारी (ता. ११) नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांतील इच्छुकांच्या मुलाखती शिर्डीत पार पडल्या. उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांमधील इच्छुक उमेदवार शिर्डीच्या बैठकीसाठी उपस्थित होते. या मतदारसंघाचे विद्यमान आमदार किशोर दराडे (येवला), गेल्या वेळी शिवसेनेकडून पदवीधर मतदारसंघात निवडणूक लढवून पराभूत झालेल्या शुभांगी पाटील (धुळे).

संस्थाचालक व शिक्षक निशांत रंधे (शिरपूर), अहमदनगरचे शिक्षक नेते भाऊसाहेब कचरे (नगर), आर. डी. निकम (नाशिक), एन. डी. नांद्रे, अर्जुन कोकाटे (नाशिक), नीलिमा आहेर, अॅड. संदीप गुळवे (नाशिक), विजयकुमार दहिते (धुळे) यांनी मुलाखती दिल्या. या मुलाखती माजी शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, आबासाहेब कोकाटे, जी. के. थोरात, के. एल. ढोमसे, आर. एच. बाविस्कर, एन. टी. पाटील, हिरालाल पगडाल यांनी घेतल्या.

या वेळी लोकशाही पद्धतीने गुणांकन करून शिक्षक निवडला जाईल, अशी माहिती नानासाहेब बोरस्ते यांनी दिली. शिक्षक मतदारसंघाचा उमेदवार हा शिक्षक असावा, याबाबतीत नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीचे एक मत झालेले आहे. मात्र ऐन वेळेवर मुलाखतीमध्ये संस्थाचालक, राजकारणी व इतर संवर्गातले लोकांनी मुलाखती दिलेल्या असून, नाशिक शिक्षक लोकशाही कोणाला उमेदवारी देते, याकडे शिक्षण क्षेत्राच्या नजरा लागून आहेत. (latest marathi news)

Teachers Constituency Election
Nashik Police : पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आज सभा; ग्रामीण पोलिसांचे ढिसाळ नियोजन

नाशिक शिक्षक लोकशाही आघाडीमध्ये अनेक उमेदवार ‘टीडीएफ’ला एक पर्याय म्हणून पाहात असले तरी वैयक्तिक यंत्रणा, जनसंपर्क आणि शिक्षक बांधवांमध्ये असणारी लोकप्रियता, शिक्षकांची प्रश्न सोडवणारी सचोटी या गुणवैशिष्ट्यांवर येणाऱ्या काळात मतदान होईल, असा राजकीय विश्‍लेषकांचा अंदाज आहे.

मुलाखतीप्रसंगी नाशिक विभागाचे टीडीएफचे अध्यक्ष संजय पवार, कार्यवाह अरविंद कडलग, खजिनदार मोहन चकोर, जिल्हाध्यक्ष आर. आर. पाटील (जळगाव), जिल्हाध्यक्ष एन. टी. पाटील (नंदुरबार), जिल्हाध्यक्ष मधुकर पवार (अहमदनगर), रवींद्र मोरे (नाशिक), राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र वाघ आदी उपस्थित होते.

तीन हजार ६०० नावे दुबार

शिक्षक मतदारसंघात ६५ हजार ४७५ मतदार आहेत. त्यात नाशिक जिल्ह्यात २३ हजार ५९७, अहमदनगर जिल्ह्यात १४ हजार ४८८, जळगाव जिल्ह्यात १३ हजार २१०, धुळे जिल्ह्यात आठ हजार २६२, नंदुरबार जिल्ह्यात पाच हजार ४१८ मतदार आहेत. शिक्षक मतदारसंघाच्या मतदारयादीमध्ये तीन हजार ६०० नावे दुबार आल्याचा आरोप मतदारसंघाचे इच्छुक उमेदवार निशांत रंधे यांनी केला आहे.

Teachers Constituency Election
Nashik Police : अन्यथा ग्रुप ॲडमिनवर दाखल होणार गुन्हा! सोशल मीडियावर सायबर पोलिसांची करडी नजर

त्यामुळे पुराव्यानिशी आम्ही दुबार आलेली नावे नाशिकच्या विभागीय महसूल आयुक्तांना सादर करून यावर ठोस निर्णय घ्यायला भाग पाडणार आहोत, असे त्यांनी सांगितले. शिवाय तीन हजार मतदार नवीन समाविष्ट होणार असून, एकूण मतदारसंख्येत पाचशे मतदार कमी होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वैयक्तिक पातळीवर मतदारयाद्यांची छाननी इच्छुक उमेदवार करीत आहेत.

"मतदारयादीमध्ये सध्या तीन हजार सहाशे नावे दुबार सापडली आहेत. या संदर्भात आम्ही प्रत्येक नाव तपासून दुबार आलेली नावे आणि काही ठिकाणी संशयास्पद नोंदवली गेलेली नावे याची तपासणी करीत आहोत. नाशिकचे विभागीय महसूल आयुक्तांना आम्ही पुराव्यानिशी निवेदन देणार आहोत. मतदारयादीतील घोळ त्यांनी नाहीसा करावा, अशी आमची अपेक्षा आहे." - निशांत रंधे, इच्छुक, शिरपूर, जि. धुळे

"शिर्डी येथे पार पडलेल्या मुलाखतीत प्रत्येकाला मुलाखत देण्याची संधी देण्यात आली आहे. संघटनेच्या काही नियमानुसार लोकशाही पद्धतीने आम्ही मुलाखती घेतलेल्या असून, गुणांकन पद्धतीने मेरिटनुसार टीडीएफकडून उमेदवार देणार आहोत. यासंदर्भात लवकरच आम्ही अधिकृत उमेदवारी घोषित करणार आहे." - नानासाहेब बोरस्ते, माजी आमदार

Teachers Constituency Election
Nashik Lok Sabha Constituency : पंतप्रधान मोदी, शरद पवार, उद्धव ठाकरेंच्या आज नाशिक जिल्ह्यात सभा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.