Nashik News: साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांचे स्मारक दुर्लक्षित! बाबूराव बागूल स्मारकाची प्रतीक्षा

Nashik News : दसक जवळच्या स्मशानभूमी शेजारीच वामनदादा कर्डक स्मारक स्मारक दहा वर्षांपासून धूळखात पडून आहे.
Baburao Bagul & Wamandada Kardak
Baburao Bagul & Wamandada Kardakesakal
Updated on

नाशिक रोड : महाराष्ट्राची पुरोगामी सामाजिक आणि साहित्यिक चळवळ आपल्या साहित्याच्या माध्यमातून नेहमी जागृत ठेवणारे व नाशिक शहराचे नाव मराठी साहित्यात अजरामर करणारे, जगण्यातली दुःख आणि वास्तवता आपल्या साहित्यात मांडणारे दिवंगत साहित्यिक बाबूराव बागूल यांचे स्मारक महाराष्ट्र शासन आणि मनपाने नाशिक रोडला उभारू, अशी घोषणा केली होती.

मात्र अजूनही हे स्मारक प्रतीक्षेतच आहे. या ठिकाणी नदीकिनारी वामनदादा कर्डक यांचे स्मारक बांधलेले असून, वामनदादांचे अस्तित्व या स्मारकात नसल्याचा भास लोकांना होत आहे. बाबूराव बागूल आणि वामनदादा कर्डक या दोन्ही साहित्यिकांनी समाजाच्या वेदना आणि वास्तवता आपल्या साहित्यात मांडली.

मराठी साहित्य समृद्ध करणाऱ्या साहित्यिकांचे स्मारक दुर्लक्षित राहणे ही शोकांतिकाच आहे. स्मारक निर्माण करण्यात नाशिक रोडच्या लोकप्रतिनिधींसह शासनाचे अपयश असल्याची भावना स्थानिक साहित्यिक व्यक्त करीत आहे. (Nashik Memorial of writers who enriched literature neglected marathi news)

दसक जवळच्या स्मशानभूमी शेजारीच वामनदादा कर्डक स्मारक स्मारक दहा वर्षांपासून धूळखात पडून आहे. पावणेदोन एकरातील या खुल्या स्मारकाची दुरवस्था झाली आहे. स्मारकात फक्त डोम आहे. घाण, कचरा, गाजरगवत, झुडपे वाढली असून, या ठिकाणी मद्यपीचा वावर असतो.

या जागेत लाइट नावालाच असून त्यात वीजप्रवाह नाही. स्मारकात दिवसा गाई, भटकी कुत्री तर रात्री मद्यपी, जुगारी येऊन बसतात. त्यामुळे स्मारकाची दुरवस्था दूर करून सुशोभीकरणाची मागणी नागरिकांनी केली होती.

माजी नगरसेविका मीरा हांडगे, माजी नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे यांनी आमदार बाळासाहेब सानप यांच्यामार्फत स्मारक होण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. सध्या आमदार राहुल ढिकले यांनी स्मारकाची पाहणी करून हा प्रश्न तडीस नेण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, हे आश्वासन हवेत विरायला नको अशी भावना साहित्यिक व्यक्त करत आहे. (Latest Marathi News)

Baburao Bagul & Wamandada Kardak
Nashik News: रविवार कांरजावरील यशवंत मंडई पाडण्याचा मार्ग मोकळा! न्यायालयाने महापालिकेची कारवाई ठरविली योग्य

बाबूराव बागूल स्मारकाची घोषणा हवेतच

बाबूराव बागूल यांनी मराठी साहित्यात अजरामर कामगिरी केली आहे. २००८ ला त्यांचे निधन झाल्यावर स्मारक देवळाली विहीतगाव परिसरात होईल, अशी घोषणाही शासनाने केली होती. मात्र ही घोषणा हवेतच विरली असून स्मारकासाठी जागेची शोधमोहीम सुरू असल्याची माहिती त्यांच्या कुटुंबीयांनी ‘सकाळ’ला दिली आहे.

बाबूराव बागूल आजारी असताना दिवंगत डॉ. वसंतराव पवार यांनी त्यांच्या आजारपणाचा खर्च मेडिकल कॉलेजमार्फत स्वीकारला होता. त्यांच्या कुटुंबीयांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देऊ असेही सूतोवाच त्यावेळी लोकप्रतिनिधींनी केले होते. मात्र तसे काहीही झाले नाही. म्हणून बाबूराव बागूल स्मारक कोठे होणार, याची माहिती कोणालाच नाही.

"उपेक्षित साहित्यिकांची स्मारके ही प्रेरणादायी ठरू शकतात. साहित्य आणि चळवळीला नेहमी उजेडात ठेवण्याचे काम या दोन साहित्यिकांनी केले. म्हणून शासनाने या साहित्यिकांची स्मारके समृद्ध करून ती अस्तित्वात आणायला हवी. शासन यंत्रणा आणि लोकप्रतिनिधींनी यावर गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे."

- पुंजाजी मालुंजकर, ज्येष्ठ साहित्यिक, ग्रामीण साहित्य चळवळ

"वामनदादा कर्डक स्मारक अखेरचा श्वास मोजत आहे. हे स्मारक खरेतर वामनदादा गेले तेव्हा व्हायला पाहिजे होते. बागूल आणि कर्डक या दोन्ही साहित्यिकांनी मराठी साहित्य समृद्ध केले आहे. म्हणून त्याचे स्मारक करणे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. म्हणून त्यांचे विचार आणि साहित्य प्रसारासाठी त्यांचे स्मारक होणे आवश्यक आहे."- सुशीला संकलेचा, कवयित्री.

"छगन भुजबळ उपमुख्यमंत्री असताना आबांच्या स्मारकासाठी आडगावला जागा पहिली होती. मात्र म्हाडाने यावर आधीच आरक्षण टाकले होते. दिवंगत माजी नगरसेविका सत्यभामा गाडेकर यांनीही प्रयत्न केले होते. भेटून हा विषय सांगितला होता. आबांना जेथे अग्निडाग दिला तिथे स्मारक व्हावे ही आमची इच्छा आहे." - विनय बागूल, बाबूराव बागूल यांचा मुलगा

Baburao Bagul & Wamandada Kardak
Nashik News: कोरोनानंतर रामतीर्थावर भिकाऱ्यांच्या संख्येत चौपट वाढ! व्यसनाधिनता, गुन्हेगारीतही वाढ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()