Nashik News : पितृपक्षातच पूर्वजांच्या स्मृती अडगळीत! देवदेवतांसह आप्तस्वकीयांच्या तसबिरी थेट गोदाघाटावर

Latest Nashik News : ऐन पितृपक्षात देवदेवता, आई-वडिलांसह आजोबा, पणजोबांच्या तसबिरी (फोटो) गोदाघाटावरील मोकळ्या जागांवर टाकून दिलेल्या आढळून येत आहेत.
pitru paksha
pitru pakshaesakal
Updated on

Nashik News : कधीकाळी घराघरांत भिंतींवर दिमाखात झळकणाऱ्या देवदेवतांसह ज्येष्ठांच्या तसबिरी आता अनेकांना नकोशा झाल्या आहेत. त्यामुळे ऐन पितृपक्षात देवदेवता, आई-वडिलांसह आजोबा, पणजोबांच्या तसबिरी (फोटो) गोदाघाटावरील मोकळ्या जागांवर टाकून दिलेल्या आढळून येत आहेत. (memory of ancestors neglected in Pitru paksha)

‘हम दो, हमारे दो’च्या काळात अनेकांना घरातील ज्येष्ठ नकोसे झालेत, हे वास्तव आहे. त्यामुळे जिवंत, हाडामासाची माणसे सोडाच पण कधीकाळी घराच्या दिवाणखान्यात एका रांगेत लावलेले पूर्वजांचे फोटो, देवदेवतांचे फोटोही अनेकांना आता घरात नकोसे झाले आहेत. त्यामुळे देवदेवतांसह पूर्वजांचे फोटो चक्क गोदाघाटावरील मोकळ्या जागांसह तपोवनात गोदातीरी टाकून देण्यात येत आहेत.

दिवाणखान्याचे स्वरूप बदलले

घरातील दिवाणखान्याच्या भिंतीवर आईवडील, आजोबा, पणजोबा यांच्यासह देवदेवतांचे फोटो एका रांगेत लावण्याची पद्धत काही काळापूर्वी अस्तित्वात होती, नव्हे असे फोटो संबंधित कुटुंबप्रमुखाच्या समाजातील प्रतिष्ठेचा मापदंड मानला जाई. ग्रामीण भागातील सावकार, जमीनदार यांच्याकडील असे फोटो म्हणजे त्या कुटुंबाचे वैभव, संपत्ती समजली जात असे.

कालौघात अनेकांना आईवडिलांचेच फोटो नकोत तेथे त्यामागील पिढीला कोण विचारतो, अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. ‘टु रूम किचन’च्या जमान्यात अशा जुन्या स्मृती सांभाळणे अनेकांना अवघड झाले आहे, परंतु त्याहीपेक्षा मोठी घरे असलेले अनेकजण भिंतींवर वॉलपीस किंवा अन्य शोभेच्या वस्तू लावतील, परंतु असे जुने फोटो कोणालाच नकोत, हे वास्तव आहे. (latest marathi news)

pitru paksha
Nashik News : सिन्नर येथे वीज पडल्याने मंदिराच्या कळसाचे नुकसान! शेकडो पारव पक्षांचा गेला बळी

यांनी मागे काहीच ठेवलेले दिसत नाही...

मध्यंतरी तपोवनात एका संस्थेच्या कार्यक्रमासाठी तत्कालीन महापौरांनाही आमंत्रित करण्यात आले होते. समारंभाच्या ठिकाणी लवकर दाखल झालेल्या महापौरांनी सोबत असलेल्या कार्यकर्त्यासह सकाळच्या रम्यवेळी नदीकिनारी फेरफटका मारला.

तेव्हा त्यांना नदीपात्राच्या कडेला चिखलात टाकून दिलेले महिला व पुरुष अशा दोन ज्येष्ठांचे फोटो दिसले. त्यांनी ते अलगद उचलून सन्मानपूर्वक बाजूला ठेवत यांनी पुढील पिढीसाठी काहीच ठेवलेले दिसत नाही, अशी बोलकी प्रतिक्रिया नोंदविली होती.

"नव्वदच्या दशकापर्यंत माझघरातील फोटो हे तत्कालीन समाजात प्रतिष्ठेचे मानले जाई. आता फ्लॅट संस्कृतीच्या काळात जागा असली तरी अनेकजण अशा फोटोंऐवजी वॉलपीस लावण्यास पसंती देतात, हे वास्तव आहे."- ॲड. भानुदास शौचे, कार्यवाह, शुयमा ब्राह्मण संघ

pitru paksha
Akola Youth Festival 2024 : अकोल्यात खंडेलवाल महाविद्यालयात भरणार कलेचा कुंभमेळा, 5 जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा सहभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.