Civil Services Exam : राज्‍य सेवा 2022 ची गुणवत्तायादी जाहीर; विकल्‍प सादरीकरणासाठी 27 पर्यंत मुदत

Civil Services Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ या परीक्षेची गुणवत्तायादी बुधवारी (ता. २०) प्रसिद्ध केली आहे.
Civil Services Exam
Civil Services Exam esakal
Updated on

Civil Services Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्‍य सेवा (मुख्य) परीक्षा २०२२ या परीक्षेची गुणवत्तायादी बुधवारी (ता. २०) प्रसिद्ध केली आहे. तसेच पदनिहाय तात्‍पुरत्‍या निवड याद्या आयोगाने प्रसिद्ध केल्‍या आहेत. यादीतील उमेदवारांना बाहेर पडण्याची (ऑप्टिं‍टींग आउट) विकल्‍प नोंदविण्यासाठी २७ मार्चपर्यंत मुदत दिली आहे. निवडयादीत नाशिकच्‍या यतीन रमेशचंद्र पाटील याने दहावा क्रमांक पटकावताना उपजिल्‍हाधिकारीपदाला गवसणी घातली आहे. (nashik Merit List of Civil Services 2022 announced marathi news)

एमपीएससीतर्फे राज्‍य सेवा परीक्षा २०२२ ची प्रक्रिया पूर्ण केली असून, परीक्षेची तात्‍पुरती निवडयादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवारांच्‍या अर्जामधील विविध दाव्‍यांच्‍या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे, प्रमाणपत्रे पडताळणी करताना ऑप्टिं‍ग आउटमुळे काही उमेदवारांच्‍या दाव्‍यांमध्ये बदल होऊ शकतो व पर्यायाने उमेदवाराचा गुणवत्ता क्रम आणि शिफारशीचे पद बदलू शकते, असे आयोगाने स्‍पष्ट केले आहे.

गुणवत्ता यादीतील उमेदवारांना आयोगाच्‍या संकेतस्‍थळावर ऑप्टिंग आउटचा पर्याय नोंदविण्यासाठीची लिंक गुरुवार (ता. २१)पासून सक्रिय होणार असून, २७ मार्चपर्यंत पर्याय नोंदविता येणार आहे. या गुणवत्ता यादीत एक हजार ५७३ उमेदवारांच्‍या नावांचा समावेश केलेला आहे.(latest marathi news)

Civil Services Exam
Indian Forest Service Exam : कंदरचा तुषार शिंदे इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस या परीक्षेत देशात 36 वा

किसनची शिक्षणाधिकारीपदी भरारी

एकलव्य स्पोर्ट्स इन्स्टिट्यूटचा खेळाडू व महिंद्र ॲन्ड महिंद्र प्रायोजित आंतरराष्ट्रीय धावपटू किसन तडवी याने शिक्षणाधिकारीपदाला गवसणी घातली आहे. या परीक्षेत क्रीडा क्षेत्रातील कोट्यातून त्‍याने गुणवत्ता यादीत स्‍थान मिळविले आहे. तो सध्या केंद्रीय उत्‍पादन शुल्‍क विभागात भरती झाला होता. त्याचे अभिनंदन प्रशिक्षक विजेंद्र सिंग, महिंद्रचे उपाध्यक्ष चंद्रकांत धांडे, चंद्रा बॅनर्जी आणि अनिल वाघ यांनी केले आहे.

असे आहेत निवड झालेले उमेदवार

तात्‍पुरत्‍या निवड यादीमध्ये उपजिल्‍हाधिकारीपदासाठी ३३ उमेदवारांची निवड केली आहे. पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस आयुक्‍त या पदासाठी ४१ उमेदवारांच्‍या नावांचा समावेश आहे. राज्‍य कर विभागातील सहाय्यक आयुक्‍तपदासाठी ४७, सहकारी सोसायटीतील उपनिबंधकपदासाठी दोन, गटविकास अधिकारीपदासाठी १४, वित्त व लेखा विभागातील सहाय्यक संचालकपदासाठी सहा, महापालिका, नगरपालिका येथील अधिकारीपदासाठी २२, तर शिक्षण विभागात शिक्षणाधिकारी या पदासाठी २० उमेदवारांच्‍या नावाचा समावेश केला आहे.

Civil Services Exam
Civil Services Exam : राज्‍यसेवा मुख्य परीक्षेचा आज अखेरचा दिवस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.