MHT-CET Exam Result : एमएचटी-सीईटी परीक्षेचा आज निकाल

Nashik News : बहुप्रतीक्षित एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (ता. १६) सायंकाळी सहाला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे.
MHT-CET Result 2024
MHT-CET Result 2024 esakal
Updated on

Nashik News : बहुप्रतीक्षित एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल रविवारी (ता. १६) सायंकाळी सहाला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. यासंदर्भात सीईटी सेलने माहिती जारी केली. निकाल जाहीर होताच पुढील प्रवेशप्रक्रियेला वेग येणार आहे. अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्‍त्र व कृषी शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी राज्‍यस्‍तरावर एमएचटी-सीईटी परीक्षेचे आयोजन केले होते. (MHT CET Exam Result Today)

भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व गणित (पीसीएम) आणि भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र व जीवशास्‍त्र (पीसीबी) अशा दोन ग्रुपमध्ये ही परीक्षा घेण्यात आली होती. संगणकावर आधारित (कॉम्प्‍युटर बेस्ड टेस्‍ट) या परीक्षेचे आयोजन विविध सत्रांमध्ये केले होते.

त्‍यामुळे परीक्षेचा निकाल पर्सेंटाईल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे. दरम्‍यान, सीईटी सेलतर्फे यापूर्वी निकालाची संभाव्‍य तारीख नमूद केलेली असताना सुधारित सूचना जारी करताना १९ जूनपूर्वी निकाल जाहीर करणार असल्‍याचे स्‍पष्ट करण्यात आले होते. (latest marathi news)

MHT-CET Result 2024
Nashik Bakri Eid Traffic Route Change : ‘बकरी ईद’मुळे वाहतूक मार्गात बदल! सोमवारी वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा करावा वापर

तत्‍पूर्वी, रविवरी सायंकाळी सहाला या परीक्षेचा निकाल जाहीर केला जाईल. सीईटीचा निकाल जाहीर होताच औषधनिर्माणशास्‍त्र, अभियांत्रिकी व कृषी शाखांतील पदवी अभ्यासक्रमांच्‍या प्रथम वर्ष प्रवेशाच्‍या प्रक्रियेला गती मिळणार आहे.

MHT-CET Result 2024
Nashik Rural Police Recruitment: ग्रामीण पोलीस भरतीच्या धावण्याची चाचणी 19 पासून! भुजबळ नॉलेज सिटीतील वाहतूक मार्गात बदल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.