Nashik Milk Rate Hike : चाराटंचाईने दुधाचे दर वाढले! म्हशीचे दूध 80, तर गायीचे 55 रुपयांवर

Milk Rate Hike : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत.
Nashik Milk Rate Hike
Nashik Milk Rate Hikeesakal
Updated on

Nashik Milk Rate Hike : दुष्काळामुळे हिरवा चारा महागला आहे. त्यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत. शहरात म्हशीचे दूध ८० रुपये लिटरवर पोचले आहे. तर गायीचे दूध ५५ रुपयांवर पोचल्याने सर्वसामान्यांना दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जिल्ह्यात यंदा अभुतपूर्व दुष्काळ पडल्यामुळे मार्चपूर्वीच टँकरने द्विशतक पूर्ण केले. पावसाअभावी मका, बाजरी व इतर पिके करपून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या हाती चाराही लागला नाही. (Nashik Milk Rate Hike Due to shortage of fodder milk prices have increased marathi news)

दुसऱ्या तालुक्यांमधून चाऱ्याची वाहतूक करून शेतकरी आता जनावरांना जगवतो आहे. पण दूध देणारी गाय, म्हैस, गीर गाय आदींना हिरवा चारा लागतो. दिवसभरात गाय ४० किलो चारा खाते. तर म्हशीला ५० किलो चारा लागतो. चार ते पाच रुपये किलोप्रमाणे हा चारा मिळत असल्याने एका दिवसाला १६० ते २०० रुपयांपर्यंत खर्च शेतकऱ्यांना येतो. त्यावर उपाय म्हणून मुरघास बॅगमध्ये हिरव्या चाऱ्याचे तुकडे करून साठवला आहे.

एक, तीन व पाच टनाची एक बॅग असल्याने चारा साठवणे शक्य होत आहे. चाऱ्याचे दर वाढल्याने परिणामी शहरात दुधाचे दर वाढले आहेत. म्हशीचे दूध ८० रुपये लिटर, गायीचे ५५ रुपये लिटरने विकले जात आहे. ग्रामीण भागातील दूध डेअरीमध्ये हा दर अनुक्रमे ४० व २५ रुपये असल्याने दूध उत्पादकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येते. दूध डेअरीवाल्यांनी गायीच्या दुधाचे दर दोन रुपयांनी कमी केले आहेत.  (latest marathi news)

Nashik Milk Rate Hike
Milk Rates Hike : सर्वसामान्यांचा रोजचा चहा कडू; दुधाच्या भावाने गाठली शंभरी!

चाऱ्यापेक्षा पाणीटंचाईचे संकट

ग्रामीण भागात सद्यःस्थितीला जनावरांना चाऱ्यापेक्षा पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. चारा दुसऱ्या तालुक्यातून, जिल्ह्यातून विकत आणणे शक्य आहे. पण पाणी मिळणे अवघड होत असल्याने टँकरद्वारे विकत पाणी घ्यावे लागते. पाच हजार लिटरच्या टँकरसाठी पंधराशे रुपये खर्च करावे लागतात. टँकरचे दर अजूनही वाढतील, असा अंदाज आहे.

''शहरातील व ग्रामीण भागातील दुधाच्या दरात मोठी तफावत असते. पण चाराटंचाईमुळे दर वाढले आहेत. शेतकऱ्यांना चाऱ्यापेक्षाही पाणीटंचाई मोठ्या प्रमाणात जाणवते. जनावरांसाठी आत्तापासूनच पाणी विकत घ्यावे लागत आहे.''- नवनाथ आव्हाड, दूध उत्पादक

Nashik Milk Rate Hike
Nashik Vegetables Rate Hike : मालेगावला उन्हामुळे भाजीपाला कडाडला!

लिटरनिहाय दुधाचे दर (रुपये)

प्रकार..............शहरात........ग्रामीण भागात

म्हैस..............८० ते ८५.......४० ते ५०

गावठी गाय...५० ते ५५.......२५ ते ३५

गिर गाय.......७० ते ८०.......४० ते ५०

तुपाचे दर (किलो)

गावठी गाय...५५० ते ६०० रुपये

म्हैस......७०० ते ७५० रुपये

गीर गाय...२२०० ते ३००० रुपये

Nashik Milk Rate Hike
Nashik Tomato Rates Hike: हंगामाच्या अखेरीला टोमॅटोच्या दराला लाली! दुबईसह आखाती देशात डंका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.