नाशिक : घरोघरी समांतर दाबाने वीजपुरवठा करण्यासाठी महावितरणने शहरात जागोजागी लावलेल्या लाल पेट्या अर्थात मिनी पिलर धोकादायक स्थितीत उभ्या आहेत. एक तर पेट्यांची उंची कमी, त्यात गर्दुल्ले व भुरट्या चोरांकडून सहजपणे झाकणे काढून विकली गेल्याने उघडे मिनी पिलर कुठल्याही क्षणी जीव घेण्यास कारणीभूत ठरू शकतात. विशेष करून लहान मुलांसाठी धोकादायक ठरत आहेत. महावितरण कंपनीने वीजपुरवठ्यासाठी शहरात मिनी पिलर उभे केले आहेत. (mini pillar can be life threatening situation on spot )