नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने कांद्यावरील किमान निर्यातमूल्य ५५० डॉलर प्रतिटन हटविण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. १३) घेतला. यामुळे निर्यात खुली होण्याचा मार्ग मोकळा झालेला असला, तरी ४० टक्के निर्यातशुल्क कायम राहणार आहे. त्यात कपात झाली तर निर्यात पूर्णतः खुली होईल. (Minimum export value on onion export removed)