नाशिक : अवघ्या काही दिवसांपूर्वी वातावरणात वाहत असलेल्या शीतलहरींमुळे तापमान चौदा अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले होते. परंतु, दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण व अन्य विविध कारणांनी पाऱ्यात वाढ झालेली आहे. रविवारी (ता.१७) नाशिकचे किमान तापमान १७.७ अंश सेल्सिअस नोंदविले. पारा वाढल्याने थंडीत घट झाली होती. यंदाच्या मॉन्सूनमध्ये दमदार पाऊस झाल्यानंतर हिवाळ्यात कडाक्याची थंडी राहील असा अंदाज वर्तविला जात होता. ( minimum temperature decrease reaches 17 degrees in city )