Chhagan Bhujbal : लग्नाचे मुहूर्त पुढे ढकलण्याचे सल्ले मनोज जरांगे-पाटील देतात. त्यामुळे आता काय बोलावे, हे समजत नाही. त्यांना जे नेता मानतात, अशा सर्वांना मी नमस्कार करतो, अशी उपरोधिक टीका राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी करताना जरांगे यांना राजकीय पाठिंबा असून, त्यांना कोण चुकीचे सल्ले देत आहे, हे लवकरच बाहेर येईल, अशी प्रतिक्रिया दिली. (nashik Minister Chhagan Bhujbal criticism on manoj jarange patil marathi news)
नाशिक दौऱ्यावर आलेल्या भुजबळ यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की मनोज जरांगे-पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. मी मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याच्या भूमिकेला पाठिंबा दिला. आता आरक्षण दिल्यावर आंदोलन करण्याचे कारण नाही. निवडणूक प्रचारासाठी लोक गावात जातील, त्यांना अडविणे लोकशाहीला धरून नाही. आरक्षण दिल्यावर आंदोलन का? आम्ही विरोध केला असता तर आंदोलन केले तर ठीक होते.
शरद पवार म्हणजे घड्याळ
निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तुतारी चिन्ह दिले. त्याबाबत बोलताना भुजबळ म्हणाले, की शरद पवार गटाला तुतारी हे नवीन चिन्ह बिंबवावे लागेल. स्मार्टफोन, सोशल मीडियामुळे फार अडचण येणार नाही. मात्र, ग्रामीण भागात शरद पवार म्हणजे घड्याळ हे लोकांना माहिती आहे.
भुजबळ कुटुंब घाबरत नाही
नांदगावचे माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या मालेगाव दौऱ्याला मराठा समाजाच्या आंदोलकांनी विरोध केला. त्यावर बोलताना ते म्हणाले, की पंकज भुजबळ यांना अडविणारे लोक कोण होते, हे पाहणे गरजेचे आहे. मराठा समाजाचे लोक होते, तेही पोलिसांनी तपासले पाहिजे. भुजबळ कुटुंबीय आले तर मारा, असे म्हणतात. मात्र, भुजबळ कुटुंबीय घाबरत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम केले आहे, घाबरणार नाही, असा सूचक इशाराही त्यांनी दिला. (latest marathi news)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.