Chhagan Bhujbal : वीस वर्षापासून ज्या येवला, लासलगाव विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्याच मतदारसंघात हेवीवेट नेते मंत्री छगन भुजबळ यांचे मतदान नव्हते... यावेळी प्रथमच आपल्या बालेकिल्ला त्यांनी कुटुंबीयांसमवेत मतदानाचा हक्क बजावला..आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास भुजबळ यांनी आपल्या कुटुंबियांसमवेत येवला शहरातील जनता विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्नी मीनाताई भुजबळ, आमदार पंकज भुजबळ, विशाखा भुजबळ यांच्यासह कुटुंबातील सदस्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. भुजबळ येवल्या येण्यापूर्वी माझगाव मतदार संघाचे प्रतिनिधी होते त्यामुळे त्यांचे मतदान त्या ठिकाणीच होते..Nashik Vidhan Sabha Election 2024 : निवडणूक साहित्य आज होणार रवाना : जलज शर्मा .२००४ मध्ये ते येवल्यात आले असले तरी त्यांनी आपले मतदान तिकडेच ठेवलेले होते. या ठिकाणी निवडणूक लढवत असल्याने अनेकदा येथेच थांबून राहत त्यांना माझगावला मतदानालाही जाण्यासाठी अडचणी येत होत्या. तसेच मागील निवडणुकीत त्यांचे या मतदारसंघात मतदान नसल्याने त्यांनी केंद्रांवर भेटी देऊ नये असा आक्षेप विरोधकांनी घेतला होता व प्रशासनाने तो मान्यही केला होता.या सर्व पार्श्वभूमीवर आता भुजबळांनी येवल्याच्या मतदार यादीत नाव ट्रान्स्फर केले असून वीस वर्षानंतर प्रथमच येथे मतदान केले मतदान केल्यानंतर विजयाची खून करत मतदान केंद्रातून बाहेर आल्यानंतर आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तसेच केंद्राबाहेर असलेल्या सेल्फी पॉइंटवर पत्नी,मुलगा,सुनेसोबत त्यांनी सेल्फी घेतली. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार माणिकराव शिंदे यांनी देखील कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला..Nashik Vidhan Sabha Election: जिल्ह्यात दिवसभर छुपा प्रचार, सोशल मीडिया प्रचाराची धूम; उमेदवारांसह पक्ष कार्यकर्त्यांसाठी रात्र वैऱ्याची.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.