Nashik-Pune Railway : पुणे-नाशिक रेल्वे मार्ग तातडीने मार्गी लावा; पालकमंत्री दादा भुसेंचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

Nashik-Pune Railway : नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे.
Dada Bhuse
Dada Bhuseesakal
Updated on

Nashik-Pune Railway : गोल्डन ट्रँगल म्हणून ओळख निर्माण झालेल्या मुंबई- पुणे- नाशिक ही तिन्ही शहरे औद्योगिकदृष्ट्या महत्त्वाची असल्याने नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी द्यावी, अशी मागणी पालकमंत्री दादा भुसे यांनी रेल्वेमंत्री आश्विन वैष्णव यांच्याकडे केली आहे. नाशिकहून मोठ्या प्रमाणात नागरिक पुण्यात स्थायिक आहेत. त्यानिमित्ताने प्रवास होते. पुणे, नाशिक ही दोन महत्त्वाची शहरे अजूनही रेल्वे मार्गाने जोडली नाहीत. ( Dada Bhuse statement of nashik Pune railway line should be opened immediately )

त्यामुळे पुणे ते नाशिक रस्त्याने जाण्यासाठी सुमारे पाच ते सहा तासांचा कालावधी लागतो. रेल्वे प्रकल्प एमआरआयडीसीच्या माध्यमातून होणे आवश्यक आहे. राज्य शासनाने पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला १५ एप्रिल २०२१ ला मंजुरी दिली. १६ फेब्रुवारी २०२२ ला रेल्वे मंत्रालयाने मान्यता दिली. २८ जुलै २०२१ ला मध्य रेल्वेकडूनही प्रकल्पाला मंजुरी मिळाली.

केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून, हा प्रकल्प सध्या भारत सरकारच्या कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. या प्रकल्पासाठी भूसंपादन, वनहस्तांतरण, शासनाचे काम प्रगतिपथावर आहे. मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर या प्रकल्पाची उर्वरित कामे तातडीने सुरू होतील. त्यामुळे तातडीने प्रकल्पाला मंजुरी मिळावी, अशी मागणी पत्रात करण्यात आली आहे.(latest marathi news)

Dada Bhuse
Pune Railway News : रेल्वेचा इतिहास अनुभवता येणार ; पुणे स्थानकात नॅरोगेज डब्यात साकारणार गॅलरी

असा आहे नाशिक-पुणे रेल्वे मार्ग

- २३५ किलोमीटर लांबी.

- या मार्गावर १८ बोगदे.

- १९ उड्डाणपूल.

- २०० किलोमीटर प्रतितास वेगाने सेमी हायस्पीड रेल्वे.

- संपूर्ण मार्ग विद्युतीकरण.

- पहिल्या टप्प्यात ६ कोचची रेल्वे धावणार.

- मार्गावर एकूण २० स्टेशन राहतील.

- मार्ग पूर्ण झाल्यावर पुणे-नाशिक प्रवास पावणेदोन तासांवर.

Dada Bhuse
Nashik Pune Railway : पुणे-नाशिक रेल्वे शिर्डीमार्गे नको : आमदार सत्यजित तांबे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com