Nashik News : संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांच्या पायी दिंडी सोहळ्यासाठी राज्य शासनाकडे सादर झालेल्या साडेपाच कोटींच्या प्रस्तावास दोन दिवसांत मान्यता देण्याची ग्वाही ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे प्रशासनाने सुटकेचा निःश्वास टाकला असून, विश्वस्त मंडळासह अधिकाऱ्यांनाही मंजुरीची प्रतीक्षा लागून आहे. (Minister Girish Mahajan statement Sant Nivruttinath Maharaj Approval of Nirmal Vari proposal)
त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिराच्या अध्यक्षा कांचन जगताप, आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, विश्वस्त ॲड. सोमनाथ घोटेकर, पालखी सोहळाप्रमुख नारायण मुठाळ आदींनी मंगळवारी (ता. ११) मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्र्यंबकेश्वर येथून २० तारखेला पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे.
२८ दिवसांच्या या संपूर्ण सोहळ्यासाठी राज्य सरकारने ‘निर्मल वारी’च्या माध्यमातून सहा कोटी ३३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचा आराखडा तयार करण्यास जिल्हा परिषदेला सहा महिने विलंब झाला. प्रस्तावात अनेकदा बदलही सुचविण्यात आले, आता अगदी दहा दिवसांवर हा सोहळा आल्यानंतर प्रस्ताव शासनाकडे सादर झाला.
ऐनवेळी प्रस्ताव नामंजूर झाल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी जिल्हा नियोजन समितीकडून ५० लाखांची तरतूद केली आहे. या सर्व घडामोडींमध्ये साडेपाच कोटींचा आराखडा ‘पाण्यात’ जाण्याची शक्यता निर्माण झाल्यानंतर विश्वस्त मंडळाने मंगळवारी ग्रामविकासमंत्री महाजन यांची मुंबईत भेट घेतली. (latest marathi news)
‘निर्मल वारी’चा प्रस्ताव दोन दिवसांत मंजूर केला जाईल, असे आश्वासन मंत्री महाजन यांनी दिल्याचे विश्वस्त अमर ठोंबरे यांनी सांगितले आहे. दरम्यान, मंत्री महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून प्रस्तावाविषयी विचारणा केली. जिल्हा परिषदेने हा प्रस्ताव उशिरा पाठविल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आषाढी वारी १७ जुलैला आहे. त्यासाठी २० जून ते १७ जुलै या कालावधीत वारकऱ्यांना पुरविण्यात येणाऱ्या मूलभूत सुविधांचा या आराखड्यात समावेश केला आहे.
"ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना निर्मल वारीचे निमंत्रण दिले आहे. निर्मल वारीचा प्रस्ताव लवकर मंजूर करावा यादृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. दोन दिवसांत निधी वर्ग झाल्यास पुढील प्रक्रिया सुरळीत होईल." - कांचन जगताप, अध्यक्षा, संत निवृत्तिनाथ महाराज समाधी मंदिर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.