नाशिक : अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिकेवर डॉक्टरकडून बलात्कार

Rape
Rapeesakal
Updated on

नाशिक : सिडकोतील नामांकित हॉस्पिटलच्या संचालक डॉक्टरनेच हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी अल्पवयीन परिचारिकेवर बलात्कार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. नराधम डॉक्टरविरोधात अंबड पोलिसात पोक्सो, ॲट्रॉसिटीसह बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. उल्हास पांडुरंग कुटे ( ५०, रा. मोरवाडी, सिडको) असे संशयित नराधम डॉक्टरचे नाव आहे.

Rape
नाशिक शहरात तीन घरफोड्या; पावणेपाच लाखांचा मुद्देमाल चोरी

पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार, सिडकोतील विजयनगर परिसरात संशयित डॉ. उल्हास कुटे याचे संचलित हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन प्रशिक्षणार्थी परिचारिका आहे. पीडित त्याच ठिकाणी रहावयास होती. दरम्यान, संशयित डॉ. कुटे गेल्या शनिवारी (ता.१०) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास हॉस्पिटलमध्ये गेला. त्यावेळी पीडिता तिच्या रुममध्ये एकटीच होती. संशयिताने हातपाय दुखत असल्याच्या निमित्ताने पीडितेच्या रुममध्ये प्रवेश केला आणि आतून कडी लावून घेत पीडितेवर बळजबरीने अत्याचार केला. तसेच, याबाबत कोणाला काही सांगितल्यास कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली.

Rape
नाशिक : व्यावसायिकाचे अपहरण करून खून; मालेगाव जवळ सापडला मृतदेह

दुसऱ्या दिवशी सकाळी पीडितेने सदरची बाब घरच्यांना कळविली. त्यानंतर पालकांनी हॉस्पिटल गाठले आणि त्यानंतर अंबड पोलिसात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार, संशयित डॉ. कुटे याच्याविरोधात ॲट्रॉसिटीसह पोक्सो, बलात्कार व धमकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित डॉ. कुटे यास अटक करण्यात आली आहे. सदरील गुन्ह्याचा तपास सहायक आयुक्त सोहेल शेख हे गुन्ह्याचा तपास करीत आहेत.

Rape
Nashik: उकळत्या तेलात हात घालून महिला वडापाव काढते, अंगावर काटा आणणारा Video

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()