Nashik News : फोन पे मुळे लागला बेपत्ता तरुणीचा शोध!

Nashik News : मुंबई नाका पोलिसांनी फोन पे वरून बेपत्ता तरुणीचा शोध लावला आहे. बेपत्ता तरुणीस पोलिसांनी माऊंट अबू येथून ताब्यात घेत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले.
missing
missing esakal
Updated on

Nashik News : मुंबई नाका पोलिसांनी फोन पे वरून बेपत्ता तरुणीचा शोध लावला आहे. बेपत्ता तरुणीस पोलिसांनी माऊंट अबू येथून ताब्यात घेत कुटुंबीयांच्या ताब्यात दिले. पोलिस ठाणे हद्दीतील २० वर्षीय तरुणी रविवारी (ता.२१) रोजी बेपत्ता झाली असल्याची नोंद मुंबई नाका पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. (Missing girl found due to phone pay app)

घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष नरुटे यांनी त्वरित तरुणीच्या शोधार्थ कारवाई सुरू केली. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण प्रणालीद्वारे तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम कुटुंबीयांची चौकशी केली. त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासास सुरवात केली. तरुणीचा मोबाईल ट्रेस केला. मोबाईलचे शेवटचे लोकेशन जयपूर (राजस्थान) असे आल्याचे समजले.

त्यानुसार सचिन सावंत आणि रोहन कांडळ यांनी नाशिक, मध्यप्रदेश ते राजस्थान प्रवास करून राजस्थानी येथे दाखल झाले. येथील ७ ते ८ लॉजची तपासणी केली. सीसीटीव्ही चेक केले तसेच परिसरात नागरिकांना तिचा फोटो दाखवून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुठलीही माहिती मिळू शकली नाही. यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेतली. दरम्यान तिच्या मैत्रिणीला फोन करून माहिती घेतली.

तिने जयपूर राजस्थान येथील बेपत्ता तरुणीच्या मित्रास फोन पे च्या माध्यमातून पैसे पाठविल्याची माहिती दिली. ज्या क्रमांकावर फोन पे करण्यात आले होते. तो क्रमांक तिच्याकडून घेतला. मोबाईल क्रमांक आणि फोन पे यूपीआयडी याचे लोकेशन पोलिसांनी तत्काळ काढले. (latest marathi news)

missing
Nashik News : महत्वाच्या तांत्रिक पदांची यादी सादर करा! उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या सुचना

माउंटअबू येथील लोकेशन येत असल्याने दोन्ही पोलिसांनी कर्मचाऱ्यांनी माउंटअबूच्या दिशेने प्रवास केला. सातशे किलोमीटरचा प्रवास करून लोकेशनच्या ठिकाणी दाखल झाले. परिसरात तिचा शोध घेतला असता बेपत्ता तरुणी एका घरात ती मिळून आली.

घरात एकटीच आढळून आल्याने पोलिसांनी तिची चौकशी केली. मित्राला भेटण्यासाठी माउंटअबू येथे आल्याची माहिती समोर आली. बुधवार (ता.२४) रात्री उशिरा पोलिस तरूणीसह मुंबई नाका पोलिस ठाण्यात दाखल झाले. त्यानंतर तिला सुखरूप तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.

missing
Nashik District : ‘कलेक्टोरेट’च्या वैभवशाली 155 वर्षांचा विसर; जिल्ह्याला लाभले 105 जिल्हाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.