Nashik News : रेशनच्या धान्यावर कोण मारतंय डल्ला? निफाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये गोलमाल

Nashik News : गरिबांना मोफत रेशनचे धान्य देण्याच्या शासनाच्या हेतूला अनेक ठिकाणी छेद देण्याचे प्रकार उघड झाले आहेत.
A panel not mentioning the details of ration allotment.
A panel not mentioning the details of ration allotment.esakal
Updated on

Nashik News : गरिबांना मोफत रेशनचे धान्य देण्याच्या शासनाच्या हेतूला अनेक ठिकाणी छेद देण्याचे प्रकार उघड झाले आहेत. त्यामुळे रेशनच्या धान्यावर कोण आणि कुणाच्या आशीर्वादावर डल्ला मारत आहे, असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला. निफाड तालुक्यातील अनेक गावांमधील या प्रकारामुळे आता प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. गरीब आणि गरजूंना मोफत रेशनचे धान्य दिले जात आहे. (misuse of ration grains in many villages in Niphad taluka)

केशरी कार्डधारकांना १० किलो गहू, तर १५ किलो तांदूळ दिले जातात; तर अंत्योदय कार्डधारकांना १५ किलो गहू, तर २० किलो तांदूळ दिले जातात. मात्र, अंत्योदय कार्डधारकांना १५ किलोऐवजी १२ किलो गहू, तर २० किलोऐवजी १८ किलोच तांदळाचे वाटप केले जात आहे. लाभधारकांना ऑनलाइन पावती देण्याऐवजी साध्या पावत्या दिल्या जात असल्याने रेशन वाटपात दुजाभाव केला जात असल्याचे स्पष्ट होते. केवळ गरिबांच्या अज्ञानाचा फायदा घेत असे प्रकार अनेक दिवसांपासून सुरू असल्याचा आरोप आता लाभधारक करीत आहेत.

वरिष्ठांनी चौकशी करण्याची मागणी

निफाड तालुक्यातील कारसूळ येथे लाभधारकांनी तक्रारी केल्या आहेत. येथे यापूर्वी रेशन वाटप खासगी व्यक्तीकडून सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून कारसूळ सहकारी सोसायटीकडून धान्य वाटप केले जात आहे. सहकारी सोसायटीच्या माध्यमातून धान्य वाटप करताना पारदर्शीपणाची अपेक्षा होती. परंतु, तसे होत नसल्याने लाभार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. शासन नियमानुसार धान्य वाटप का होत नाही, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (latest marathi news)

A panel not mentioning the details of ration allotment.
Nashik News : नोकरभरतीत लोकप्रतिनिधींच्या हस्तक्षेपावर फुली! राज्य लोकसेवा आयोगामार्फत होणार भरती

''कारसूळ सोसायटीकडून रेशनचे धान्य वाटप केले जात आहे. मात्र, वाटपात दुजाभाव केला जातो. अंत्योदय कार्डधारकांना गहू तीन किलो, तर तांदूळ दोन किलो कमी दिले जातात. एकीकडे शासन पारदर्शीपणाचा नारा देत असताना दुसरीकडे धान्य वाटपातील दुजाभाव कमी होणार का, हा खरा प्रश्‍न आहे.''- रामकृष्ण कंक, माजी सरपंच, कारसूळ

''विविध सहकारी सोसायटीकडून गेल्या काही महिन्यांपासून रेशनचे धान्य वाटप केले जात आहे. शासकीय नियमानुसारच धान्य वाटप केले जाते. वाटपात दुजाभाव होत असल्यास तशी माहिती घेतो.''- रामदास घेगडे, सचिव, कारसूळ सोसायटी

A panel not mentioning the details of ration allotment.
Nashik News : संबळच्या आवाजात रंगतोय बोहडा; 300 वर्षांची परंपरा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.