Nashik : समृद्धी महामार्गालगत राज्यात सुमारे १० ठिकाणी कांद्याची महाबँक सुरु करण्याचे प्रस्तावित असून त्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले होते. शेतकऱ्यांच्या हिताच्या या प्रकल्पामुळे कांद्याची साठवणूक करणे शक्य होईल व कांद्याला चांगला भाव मिळाल्यावर तो शेतकऱ्यांना विक्री करता येईल, शासनाच्यया दूरदृष्टिकोनाचे काही वर्गाने स्वागत केले असले तरी कांद्यावरील ४० टक्के निर्यातशुल्क आणि ५५० डॉलर किमान निर्यात मूल्यामुळे कृषीतज्ज्ञांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. (Mixed tone among farmers and agriculturists about government project )