Nashik News : पिंपळगाव बसस्थानकात काँक्रिटीकरणासाठी 1 कोटी 90 लाख मंजूर : आमदार दिलीप बनकर

Nashik : पिंपळगाव बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली.
fund
fundesakal
Updated on

Nashik News : पिंपळगाव बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती आमदार दिलीपराव बनकर यांनी दिली. पिंपळगाव बसवंत शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवर वसले असून, व्यापारीदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे शहर आहे. आशिया खंडातील सर्वांत मोठी पिंपळगाव बसवंत बाजार समिती असल्याने कांदा व इतर शेतमालाची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री होते. (Nashik MLA Dilip Bankar statement for concreting at Pimpalgaon Bus Stand marathi news)

शहराची लोकसंख्या जवळपास ६५ ते ७० हजार असून, शहराच्या पंचक्रोशीतील नागरिक सातत्याने शहराला जोडले आहेत. पर्यायाने प्रवाशांची वर्दळ नेहमीच असते. मात्र, पिंपळगाव बसवंतच्या बसस्थानकात पुरेशा सुविधांअभावी प्रवाशांची होणारी गैरसोय बघता बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता होती. (latest marathi news)

fund
Nashik News: महापालिका शिक्षण मंडळाच्या कार्यालयातून कागदपत्रे चोरीला? प्रशासनाकडून तिघा कर्मचाऱ्यांना नोटिसा

त्यासाठी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. त्यातून बसस्थानकाच्या वाहनतळाच्या काँक्रिटीकरणासाठी एक कोटी ९० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. स्थानकावर प्रवाशांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करण्याच्या दृष्टीकोनातून सुसज्ज इमारत, स्वतंत्र उपहारगृह, स्वच्छता व इतर सुविधा करण्यासाठी यापुढील काळात प्रयत्नशील राहणार असल्याचे आमदार बनकर यांनी सांगितले.

निधी मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, छगन भुजबळ यांचे निफाड तालुक्यातील जनतेतर्फे आमदारांनी आभार मानले.

fund
Nashik News : राज्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाढत्या दुर्घटनांबाबत आराखडा करा : डॉ. गोऱ्हे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.