Nashik News : दमणगंगा-वैतरणा-देव नदी नदीजोडच्या 5 हजार 710 कोटींच्या प्रकल्पाला मंजुरी : आमदार कोकाटे

Latest Nashik News : या निर्णयामुळे सिन्नर तालुक्याच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसला जाणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.
MLA Manikrao Kokate thanking Deputy Chief Minister Ajitdada after getting approval for the river linking project. Neighbor MP Sunil Tatkare.
MLA Manikrao Kokate thanking Deputy Chief Minister Ajitdada after getting approval for the river linking project. Neighbor MP Sunil Tatkare.esakal
Updated on

सिन्नर : नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी सिन्नर तालुक्यासह मराठवाड्यासाठी उपयुक्त ठरणारा ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’ आणि ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ या दोन नदीजोड प्रकल्पांना सोमवारी (ता. १४) राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

हे दोन्ही नदीजोड प्रकल्प १५ हजार ७१० कोटी रुपयांचे असून, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकाराने हा प्रश्न मार्गी लागला आहे. या निर्णयामुळे सिन्नर तालुक्याच्या कपाळावरचा अवर्षणग्रस्ताचा कलंक पुसला जाणार असल्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. (Damanganga Vaitrana Dev river link project)

सोमवारी (ता. १४) झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’सह ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पाला मान्यता देण्यात आली. ‘दमणगंगा-वैतरणा-गोदावरी’ नदी जोड प्रकल्पासाठी १३ हजार ४९७ कोटी २४ लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पामुळे कडवा आणि देव नदीसाठी १६०.९७ दलघमी पाणी उपलब्ध होणार असून, ३३ हजार ११० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. दमणगंगा-वैतरणा लिंकचे पाणी कडवा धरण व तेथून सिन्नरची जीवनवाहिनी असलेल्या देव नदीच्या उगमस्थानी टाकण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे देव नदी बारमाही प्रवाहित होण्यास मदत होईल. (latest marathi news)

MLA Manikrao Kokate thanking Deputy Chief Minister Ajitdada after getting approval for the river linking project. Neighbor MP Sunil Tatkare.
Nagpur : आचारसंहितेच्या धसक्याने फायलींना आला वेग...अनेकांचा ‘गेम’ झाल्याची चर्चा

त्याचा थेट फायदा सिन्नर तालुक्यातील उद्योग-व्यवसाय व शेती सिंचनासाठी होणार आहे. ‘दमणगंगा-एकदरे-गोदावरी’ नदीजोड प्रकल्पासाठी दोन हजार २१३ कोटी ५३ लाख रुपये प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे १०० दलघमी पाणी उपलब्ध होणार असून, त्यातून मराठवाड्यातील १२ हजार ९९८ हेक्टर अतिरिक्त क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

"सिन्नरकरांसाठी महत्त्वाच्या असलेल्या दमणगंगा-वैतरणा लिंक प्रकल्पाच्या मंजुरीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्तिगत पातळीवर पाठपुरावा केला होता. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर दमणगंगा, वैतरणाचे समुद्राकडे वाहून जाणारे पाणी देव नदीसाठी उपलब्ध होणार आहे. सिन्नरकरांच्या कपाळावर असलेला दुष्काळाचा कलंक पुसून टाकण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे."-माणिकराव कोकाटे, आमदार (सिन्नर)

MLA Manikrao Kokate thanking Deputy Chief Minister Ajitdada after getting approval for the river linking project. Neighbor MP Sunil Tatkare.
Vidhan Sabha Election: महायुतीने शोधला कांदे-भुजबळ विवादावर उपाय! पंकज भुजबळ विधान परिषदेवर; सुहास कांदे यांचा मार्ग मोकळा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.