Nashik News : डबलडेकर उड्डाणपूल थेट विधीमंडळात आमदार राहुल ढिकलेंचा तारांकित प्रश्‍न

Nashik News : द्वारका ते दत्तमंदिर चौक या दरम्यान डबलडेकर पुलाची घोषणा करण्यात आली असली तरी अद्यापही हा पूल कागदावर देखील अवतरलेला नाही.
MLA Rahul Dhikale
MLA Rahul Dhikaleesakal
Updated on

Nashik News : द्वारका ते दत्तमंदिर चौक या दरम्यान डबलडेकर पुलाची घोषणा करण्यात आली असली तरी अद्यापही हा पूल कागदावर देखील अवतरलेला नाही. परंतु घोषणा झाल्यापासून या रस्त्यावर झालेल्या अपघातात २१ जणांचा मृत्यू झाल्याच्या तक्रारींच्या अनुषंगाने विधी मंडळात आमदार ॲड. राहुल ढिकले यांनी प्रश्‍न उपस्थित केला. (MLA Rrahul dhikale rise question double decker flyover issue directly in legislature)

नाशिक रोड ते नाशिक या दरम्यान वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. ५.९ किलोमीटर लांबीच्या रस्त्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उड्डाणपुलाची घोषणा करण्यात आली. मात्र यात मार्गावरून प्रस्तावित मेट्रो निओ देखील जाणार असल्याने त्याची दखल घेत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित डबलडेकर पूल तयार करण्याची घोषणा केली.

डबलडेकर पुलाच्या सर्वात खालच्या स्तरावरून शहराची अंतर्गत वाहतूक तर दुसऱ्या मार्गावर अवजड वाहने व तिसऱ्या स्तरावर प्रस्तावित मेट्रो निओ असे नियोजन आहे. या उड्डाणपुलासाठी पाचशे कोटी रुपयांची देखील तरतूद करण्यात आली.

नोव्हेंबर २०१६ पासून डबलडेकर पुलासाठी पाठपुरावा सुरू आहे. आमदार राहुल ढिकले यांनी पुलासाठी पाठपुरावा केला. केंद्र सरकारने २०२१ मध्ये भारतमाला योजनेत पुलाचा समावेश केला. त्यानंतरही मात्र पुलाचे काम प्रत्यक्षात झाले नाही. या दरम्यान २१ अपघात झाल्याची तक्रार नागरिकांनी केल्यानंतर डबलडेकर उड्डाणपूल तयार होण्यास लागणारा विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी थेट विधानसभेत तारांकित प्रश्नाच्या माध्यमातून विचारणा करण्यात आला आहे. (latest marathi news)

MLA Rahul Dhikale
Nashik Monsoon News : जिल्ह्यात ‘वळिवा’चा 1 हजार 489 घरांना तडाखा; 72 लाखांच्या मदतीची गरज

महापालिकेने झटकले हात

नाशिक महापालिकेकडे पत्राच्या माध्यमातून आमदार ढिकले यांनी पूल होण्यास विलंब का लागत आहे अशी माहिती विचारली असता महापालिकेने उड्डाणपुलाचे काम राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असल्याचे उत्तर दिले. त्यामुळे आता थेट विधानसभेत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

"द्वारका ते दत्त मंदिर या दरम्यान डबलडेकर उड्डाणपुलाला मंजुरी मिळाली आहे. मात्र अद्यापपर्यंत काम सुरू झाले नाही. काम का रखडले? हे शोधण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे." - ॲड. राहुल ढिकले, आमदार.

MLA Rahul Dhikale
Nashik Teacher Constituency Election : अजित पवार यांचा एक पक्ष अन चार तऱ्हा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.