नाशिक : गेल्या काही दिवसांमध्ये शहरात विनयभंगाचे प्रकार लक्षणीयरित्या वाढले आहेत. पुन्हा दोन घटना घडल्या असून, दोघींचा केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. अंबड औद्योगीक वसाहतीतील १३ वर्षीय अल्पवयीन पीडितेच्या फिर्यादीनुसार, संशयित सतिश दहाडे याने बुधवारी (ता. ४) पीडितेचा विनयभंग केला. पीडिता शाळेतून परतत असताना संशयिताने तिचा पाठलाग करीत तिच्या अंगावर कागदी चिठ्ठ्या फेकून वाट अडविली. ( molestation case is filed against 2 girl in city )