Nashik Monsoon News : जिल्ह्यात 355 मिलिमीटर पाऊस, तरी 713 गावांना टँकर! 4 धरणे ‘ओव्हरफ्लो’

Nashik News : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार धरणे ‘ओव्हरफ्लो’ झालेली दिसत असली, तरी अजूनही सात तालुक्यांमधील तब्बल ७१३ गाव-वाड्यांना टँकरनेच पाणी पुरविले जात आहे.
Gangapur Dam
Gangapur Dam esakal
Updated on

Nashik News : संततधार पावसामुळे जिल्ह्यातील चार धरणे ‘ओव्हरफ्लो’ झालेली दिसत असली, तरी अजूनही सात तालुक्यांमधील तब्बल ७१३ गाव-वाड्यांना टँकरनेच पाणी पुरविले जात आहे. जूनपासून आतापर्यंत सरासरी ३५५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. पण, दुष्काळग्रस्त तालुक्यातील तीन लाख ८३ हजार लोकांची तहान भागविण्यासाठी १८४ टँकर सुरू आहेत. (355 mm of rain in district)

जिल्ह्यात चार दिवसांपासून सौम्य संततधार सुरू आहे, तिचा जोर फारसा नसल्याने पाहिजे तसा पाऊस अद्यापही झालेला नाही. इगतपुरी व त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील पावसामुळे भावली धरण १०० टक्के भरले आहे. नांदूरमध्यमेश्‍वर, दारणा, कडवा धरणातून ८०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. या सर्व धरणांचे पाणी जायकवाडी धरणात जाणार आहे.

जिल्ह्यातील चार धरणांमधून पाणी बाहेर पडत असताना दुसऱ्या बाजूला अजूनही पूर्व पट्ट्यातील मालेगाव, नांदगाव, चांदवड, देवळा, येवला या भागात पुरेसा पाऊस झालेला नाही. सहा धरणांमध्ये थेंबभरही पाणी शिल्लक राहिलेले नाही. परिणामी, मालेगावमध्ये २७, बागलाण ३३, नांदगाव ३६, सिन्नर २५, येवला ३० व देवळा तालुक्यात दहा टँकरने पाणी पुरविले जात आहे. या भागात अजूनही मुसळधार पाऊस झालेला नाही.

तुरळक संततधार पावसामुळे खरीप हंगामाला काही प्रमाणात जीवदान मिळाले. पण, विहिरींना पाणी आलेले नाही. त्यामुळे आजही १७१ खासगी व १३ शासकीय टँकरने ५४९ वाड्या व १६४ गावांना टँकरनेच पाणी पुरविले जात आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये सलग चार दिवसांपासून १०१ मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला. सुरगाण्यात ७०, इगतपुरीत ६७.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जिल्ह्यात सरासरी २६.६, तर शहरात ३४.८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. (latest marathi news)

Gangapur Dam
Nashik News : शहरात एकावर एक झोपड्या झोपडपट्यांच्या संख्येत कमालीची वाढ

सहा धरणे कोरडी

जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू असला, तरी ओझरखेड, पुणेगाव, तीसगाव, माणिकपुंज, भोजापूर व नागासाक्या ही धरणे आजही कोरडी आहेत. जिल्ह्यातील लहान-मोठ्या २४ धरणांपैकी या सहा धरणांमध्ये थेंबभरही पाणी नाही. उर्वरित १८ धरणांमध्ये एकूण २०.३८ टीएमसी (४१ टक्के) इतका साठा आहे. २०२३ मध्ये जिल्ह्यातील धरणांत ४८.०९ टक्के साठा होता.

जून-जुलैचा पाऊस (मिमी), टक्के व टँकर

मालेगाव- २४४.१............११८.२......२७

बागलाण- २२९.२............१०६.६......३३

कळवण- २२२.७..............७८.२........००

नांदगाव- २६५.१.............१२५.९.......३६

सुरगाणा- ६२२................७२.५.........००

नाशिक- २१६..................६४.९........००

दिंडोरी- ३९२.८................१२९.२.......००

इगतपुरी- ७३९.७...............५२.१.......००

पेठ- ६१४.७...............६८.६........००

निफाड- २४२.६.................१२८.६......००

सिन्नर- २७६.२..................११८.९......२५

येवला- २७४.२..................११८.९.....२५

चांदवड- ३३४.९.................१३९.९.....२३

त्र्यंबकेश्‍वर -१०५१.१............१०२.२......००

देवळा- २७५.....................१५२........१०

-----------

एकूण- ३५५.६..................८४.......१८४

Gangapur Dam
Nashik News : आरक्षण वाढीसाठी ‘भाकप’च्या जिल्हानिहाय परिषदा; महिनाभर मोहिम

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.