Nashik Monsoon Update : जिल्ह्यात सरासरी 13 मिलिमीटर पाऊस!

Nashik News : नाशिककरांना काहीशी हुलकावणी देणारा पाऊस आता चांगलाच सक्रिय झाला असून, शनिवार मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदारपणे हजेरी लावली.
Nashik Monsoon News
Nashik Monsoon Newsesakal
Updated on

Nashik News : नाशिककरांना काहीशी हुलकावणी देणारा पाऊस आता चांगलाच सक्रिय झाला असून, शनिवार मध्यरात्रीपासून शहरासह जिल्ह्यात पावसाने दमदारपणे हजेरी लावली. शनिवारी (ता. १३) रात्रीपासून सुरू झालेला संततधार पाऊस रविवारी (ता. १४) सायंकाळपर्यंत कायम राहिल्यामुळे २४ तासांत जिल्ह्यात सरासरी १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. (Average 13 mm rain in district)

समाधानकारक पाऊस पडल्याने त्र्यंबकेश्‍वर व इगतपुरी येथील डोंगररागांवरून नैसर्गिक धबधबे वाहू लागले आहेत. त्यांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी पर्यटकांनी रविवारची सुटी या भागात घालवली. जिल्ह्यात जून ते १३ जुलैपर्यंत सरासरीच्या तुलनेत २३१ मिलिमीटर म्हणजे ८१ टक्के पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक, तर सहा तालुक्यांमध्ये कमी पाऊस झाला आहे.

दर वर्षी सर्वाधिक पाऊस होणाऱ्या चार तालुक्यांमध्ये सद्यःस्थितीला ५० टक्के पाऊस आहे. राज्यात मुसळधार पाऊस सुरू असताना जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे नाशिककरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता अजूनही मिटलेली नाही. मागील २४ तासांत १३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पाऊस पडल्याने थोडाफार दिलासा मिळाला. मुसळधार पाऊस असला तरी तो अधूनमधून पडतो आणि बराच वेळ गायब होतो. (latest marathi news)

Nashik Monsoon News
Nashik News : पंचवटीत जागोजागी पाण्याची डबकी

प्रशासनाच्या अहवालानुसार १ जून ते ११ जुलै या कालावधीत जिल्ह्यात सर्वसाधारणपणे सरासरी २८४ मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा सरासरीच्या ५३ मिलिमीटर म्हणजे १९ टक्के कमी पाऊस झाला आहे. यात सुरगाणा, इगतपुरी, पेठ आणि त्र्यंबकेश्‍वर या तालुक्यांत सर्वांत कमी पाऊस झालेला दिसून येतो. या भागात दर वर्षी मुसळधार पाऊस होतो; पण गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने येथील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

पिकांना दिलासा

जूनमधील पावसाच्या भरवशावर जिल्ह्यात मका, बाजरी, सोयाबीनची पेरणी व भाताच्या आवणीला सुरवात झाली आहे. जुलैचे पहिले बारा दिवस अक्षरशः कोरडे गेल्याने पिकांनी जागेवरच मान टाकायला सुरवात केली होती. पण शनिवार व रविवारच्या पावसाने या पिकांना जीवदान मिळाले आहे. भाताच्या आवणीलाही आता गती येईल.

Nashik Monsoon News
Nashik Monsoon Dealey : बेपत्ता पावसाने 75 टक्के पेरण्या धोक्यात? शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com