Nashik Monsoon News : संततधारेने सुखावले नाशिककर; सततच्‍या पाऊस ठरला दिलासादायक, पारा घसरला

Nashik News : गेल्‍या दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेल्‍या सततच्‍या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. संततधारेने नाशिककर सुखावले असून, पाऱ्यात घसरण होण्यास मदत झाली आहे.
Due to the rain that started in the city from Sunday morning, the citizens rushed.
Due to the rain that started in the city from Sunday morning, the citizens rushed.esakal
Updated on

Nashik News : गेल्‍या दोन दिवसांपासून शहरात सुरु असलेल्‍या सततच्‍या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. संततधारेने नाशिककर सुखावले असून, पाऱ्यात घसरण होण्यास मदत झाली आहे. रविवारी (ता.१४) दिवसभरात ४.१ मिलीमीटर पावसाची नोंद घेतली आहे. तत्‍पूर्वी काल दिवसभरात ८.९ मिलीमीटर पाऊस झाला. (Monsoon continuous rains in city for past two days have brought relief to citizens)

जुलै महिन्‍याच्‍या पहिल्‍या दिवशी पावसाची जोरदार हजेरी लावलेली असताना, त्‍यानंतर मात्र पावसाने दडी दिलेली होती. सतत ढगाळ वातावरण राहात असल्‍याने आद्रतेमुळे उकाड्यात वाढ झालेली होती. लांबलेल्‍या पावसामुळे नागरिकांची चिंता वाढली होती. परंतु शनिवार (ता.१४) दुपारी दोनला सुमारास शहरभर रिमझिम पावसाने हजेरी लावली असून, पावसाच्‍या पुर्नआगमनाने नागरिक सुखावले आहेत.

मध्यरात्रीदेखील चांगला पाऊस झाला. रविवारी (ता.१४) सकाळी साडे आठच्‍या आकडेवारीनुसार चोवीस तासांत ८.९ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली होती. व त्‍यानंतर सायंकाळी साडे पाचपर्यंत ४.१ मिलीमीटर पाऊस झाला. (latest marathi news)

Due to the rain that started in the city from Sunday morning, the citizens rushed.
Nashik Monsoon Update : जिल्ह्यात सरासरी 13 मिलिमीटर पाऊस!

दरम्‍यान सततच्‍या पावसामुळे पारादेखील घसरला असून, उकाड्यापासून त्रस्‍त नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. किमान तापमान २२.७ अंश तर कमाल तापमान २७.५ अंश सेल्‍सीयस नोंदविले गेले आहे.

रेनकोट, छत्रीचा आधार

सतत पावसाचे वातावरण राहात असताना, व्‍यापारी व नोकरदार वर्गाकडून घराबाहेर पडताना सोबत रेनकोट, छत्री बाळगायला सुरवात केली आहे. त्‍यामुळे अचानक पावसाला सुरवात जरी झाली तरी नागरिकांची धावपळ टळते आहे. अनेकांकडून या वस्‍तूंच्‍या खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये पावले वळविल्‍याचेही बघायला मिळाले.

Due to the rain that started in the city from Sunday morning, the citizens rushed.
Nashik News : कत्तलीसाठी जाणाऱ्या गाईंना जीवदान; उज्ज्वल गोशाळेचा पुढाकार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.