Nashik Monsoon Dealey : बेपत्ता पावसाने 75 टक्के पेरण्या धोक्यात? शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण

Monsoon Dealey : मृग नक्षत्राच्या चांगल्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्याने तालुका व परिसरात चिंतेचे वातावरण आहे.
Sowing rice
Sowing riceesakal
Updated on

Nashik Monsoon Dealey : मृग नक्षत्राच्या चांगल्या सुरुवातीनंतर पावसाने दडी मारल्याने तालुका व परिसरात चिंतेचे वातावरण आहे. तालुक्यात जवळपास ७५ टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पुरेशा पावसाअभावी अजूनही २५ टक्के पेरण्या खोळंबल्या आहेत. पावसाने ताण दिल्याने झालेल्या पेरण्या देखील संकटात आहेत. मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. तालुक्यातील दहापैकी केवळ कुकाणे मंडळात कमी पाऊस झाला आहे. उर्वरित नऊ मंडळांमध्ये पावसाने जूनची सरासरी ओलांडली आहे. (75 percent of sowing is at risk due to missing rains )

ज्या भागात चांगला पाऊस झाला तेथे पेरण्यांची कामे पूर्ण झाली आहेत. काही ठिकाणी अजूनही पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. गेल्या दहा दिवसांपासून पाऊस बेपत्ता आहे. अधूनमधून काही ठिकाणी पावसाचे शिडकावे येतात. दमदार पावसाची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. पाऊस लांबल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी महागडी बियाणे, खते घेऊन पेरण्या केल्या आहेत. अशातच पेरणी पूर्ण होऊन सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा करावी लागत आहे. पावसाने दडी मारली आहे.

शेतकऱ्यांनी बाजरी, मका, ज्वारी, कपाशी या पारंपारिक पिकांची पेरणी केली आहे. परंतु, पाऊस नसल्याने शेतकरी राजाची चिंता वाढली आहेत. पावसाचे प्रमाण तालुक्यातील काही गावांमध्ये कमी-अधिक आहे. पाऊस चांगला असलेल्या भागात पिके जोमात आहेत. तर काही ठिकाणी कोळपणीची लगबग सुरू झाली आहे. (latest marathi news)

Sowing rice
Nashik Monsoon News : दमदार पावसाने शेतमजुरांच्या हाताला काम; कसमादे पट्ट्यातील शेतीकामांना वेग

आतापर्यंत झालेली पेरणी

पिकाचे नाव - सर्वसाधारण क्षेत्र - टक्केवारी

मका- ३८८५०- ३०५६०- ७८.६६ टक्के

बाजरी - २६७०० - २१५५०- ८१.७१ टक्के

ज्वारी - ३२० - २७५ - ८५.९४ टक्के

कपाशी - २५७९८ - १८२५० - ७०.४६ टक्के

Sowing rice
Nashik Monsoon news : इगतपुरीत खरीप हंगामाच्या तयारीला वेग! पावसाच्या आगमनामुळे भात शेतीच्या मशागतीला सुरुवात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.