सिन्नर : तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात झालेल्या जोरदार पावसामुळे बोरखिंड पाठोपाठ कोनांबे हे धरणे रविवारी तुडुंब भरून वाहू लागली आहेत. बोरखिंड व कोनांबे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या जोरदार पावसाने पाणीसाठ्यात कमालीची वाढ झाल्याने ते ओव्हरफ्लो झाले. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. धरणातील वाढत्या पाणीसाठ्याने या परिसरातील बळीराजाला दिलासा मिळाला आहे. (Monsoon Konambe dam in Sinnar taluka is overflow )
याशिवाय स्थानिक पाणीपुरवठा योजनांना संजीवनी मिळाली आहे. म्हाळुंगी आणि देवनदीच्या उगमस्थानी गेल्या तीन-चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे कोनांबे धरणात पाण्याची आवक वाढली. कोनांबे धरणाची एकूण साठवण क्षमता ५४.५० दलघफू तर बोरखिंडची क्षमता ५५.६५ दलघफू एवढी आहे. सध्या देवनदीसह ठाणगावजवळच्या म्हाळुंगीला पूर आहे. कोनांबे धरणातून राबविण्यात आलेल्या भाटवाडीसह आठ गावे तसेच उंबरदरी धरणातून ठाणगावसह पाच गाव पाणी योजनेला संजीवनी मिळणार आहे.
धरणांच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. म्हाळुंगी नदीच्या उगमक्षेत्रात झालेल्या पावसाने ही नदी प्रवाही होऊन पाणी थेट भोजापूर धरणात पोहोचले आहे. भोजापूर धरणावर मनेगावसह १६ गावे आणि कनकोरीसह पाच गावे पाणीपुरवठा योजना अवलंबून आहे. त्यामुळे या गावातील पाणीटंचाई मिटण्यासाठी भोजापूर धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढणे अपेक्षित आहे. (latest marathi news)
भोजापूर धरणात जवळपास ५७ टक्के पाणीसाठा झाला आहे. देव नदीचे पाणी पूर्व भागाकडे गेले असून मागील वर्षी 30 जुलै रोजी धरण भरले होते यावेळी धरण दोन-तीन दिवस अगोदर उपलब्ध झाले असून यावर्षी पूर्व भागात पाऊस कमी असल्याने देव नदी जोड प्रवाहित होण्यासाठी बळीराजा आस लावून बसलेला आहे. देवनदीला येणाऱ्या पूराकडे सर्वांचेच लक्ष लागून असते.
देवनदीवर 20 ब्रिटीशकालीन बंधारे असून या 20 बंधाऱ्यांवर 20 गावांची शेती फुलत असते. टप्प्या-टप्प्यात देवनदी पूढे सरकेल तसे या बंधाऱ्यांवरील पाटचाऱ्याही वाहू लागतील. त्यातून या 20 गावांमध्ये शेती समृध्द होण्याबरोबरच गाव परिसरातील विहिरींना पाणी देखील उतरेल. त्यामुळे या 20 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटण्यास हातभार लागले. रब्बी हंगामाची काही अंशी चिंताही मिटेल.
कुंदेवाडी, मुसळगाव, दातली, खोपडी, देवपूर, किर्तागळी, वडांगळी, चोंढी, मेंढी, सोमठाणे मार्गे देवनदी सांगवी येथे गोदावरील जाऊन मिळते. त्यामुळे देवनदीला येणारं पाणी तालुक्यातील अनेक गावांना समृध्द करुन जात असते. देवनदी वाहती झाल्याने या सर्वच गावांमधील रहिवाशांचा उत्साह वाढला आहे. तसेच देव नदीचे पाणी पूर चारीतून बंदिस्ते करत पूर्व भागात नेले असून यामुळे नक्कीच कुंदेवाडी सायाळे तसेच खोपडी मिरगाव व शहा गावांना या पूर पाणी चारीचा फायदा होईल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.