Nashik Monsoon news : इगतपुरीत खरीप हंगामाच्या तयारीला वेग! पावसाच्या आगमनामुळे भात शेतीच्या मशागतीला सुरुवात

Nashik news : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामातील पावसाचे दमदार व समाधानकारक आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे.
Farmers started cultivation
Farmers started cultivationesakal
Updated on

Nashik news : इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामातील पावसाचे दमदार व समाधानकारक आगमन झाल्याने बळीराजा सुखावला आहे. खरीपाच्या तयारीला वेग आला असून, शेतकरी भात पेरणी व इतर मशागतींच्या कामांत व्यस्त आहे. भात लागवडीत अग्रेसर असणाऱ्या इगतपुरी तालुक्यात यंदा ३३ हजार ६०० हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर लागवडीचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे. (Preparation for Kharif season in Igatpuri speed up)

चालू हंगामात तालुक्यात ३१ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर भाताची लागवड करण्यात येणार आहे. तालुक्यात १२६ महसूली गावे व वाड्यांमधील शेतकरी भात, वरई, नागली, सोयाबीन, खुरसणी, मका व इतर पिके घेतात. खरीप हंगामात इंद्रायणी, फुले समृद्धी, १००८, सोनम, गरी, हाळी.

कोळपी या जातीची भात पिके घेण्यास प्राधान्य देतात. तालुक्याचे खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र ३३ हजार ६०० हेक्टर असून, यंदाच्या खरीप पेरणीचे उद्दिष्ट ३१ हजार ६०० हेक्टर असल्याची माहिती कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली. मागीलवर्षी २७ हजार ८०० हेक्टरचे उद्दिष्ट होते.

खरीप हंगामाचे नियोजन :

पीक----लागवडीचे उद्दिष्ट (हेक्टर)

भात : ३१ हजार

नागली : १ हजार ५०

वरई : १ हजार ५०

मका : २३२

भुईमूग : १८६

सोयाबीन : ४३८

खुरसणी : ५१८

मूग : ४०८

तुर : ८०

उडिद : ६६ (latest marathi news)

Farmers started cultivation
Nashik Junior Collage Admission : पहिल्‍या फेरीत 6 हजार विद्यार्थ्यांचे प्रवेश; दुसऱ्या फेरीची उद्यापासून प्रक्रिया

"जूनच्या सुरुवातीला वरुणराजाने दमदार हजेरी लावली नसली तरी शेवटी शेवटी हजेरी लावत खरीप हंगामाला योग्यवेळी सुरुवात झाली आहे. समाधानकारक व शेतीपूरक पाऊस झाल्याने व दोन-तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची भात पेरणीची लगबग चालू आहे." - पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, इगतपुरी

"इगतपुरी तालुक्यात जुलैच्या सुरुवातीलाच समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकरी वर्गाची खरीप हंगामाची लगबग चालू झाली आहे. मागीलवर्षी अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेला बळीराजा आर्थिक संकटात असतांना सुद्धा बी-बियाणे, खत खरेदी व मशागत करण्यात व्यस्त झाला आहे." - अनिल वाजे, प्रगतिशील शेतकरी, खेड

Farmers started cultivation
Nashik YCMOU News : ‘मुक्‍त’च्‍या एमबीए, बीसीएची सीईटी अर्जाची 13 पर्यंत मुदत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com