येवला : कुठे आठवडा तर कुठे दोन आठवडे होत आले पण पावसाचा थेंबही पडला नसून २० दिवसात फक्त ३७ मिमी पाऊस पडला आहे. मागील महिनाभरात तर केवळ सरीचे शिंतोडे असल्याने तालुक्यातील अनेक भागातील पिके ऊन धरू लागली आहे.
त्यातच मागील आठवड्यात कडक उन्हामुळे पूर्व भागातील मका, सोयाबीसह इतर पिके उन धरू लागली आहे. सर्वच पिके ऐन फुलोऱ्यात असून, आता जास्त पाण्याची गरज असतांना पावसाचा थेंबही पडत नसल्याने शेतकरी पुन्हा नुकसानीच्या भीतीने धास्तावले आहेत. (Only 37 mm of rain in 20 days at yeola)