Nashik Monsoon Rain : माळमाथा व परिसरात बुधवारी (ता.१२) दुपारी दोन तास जोरदार पाऊस झाला. या भागात जूनच्या अखेरच्या टप्प्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. आजच्या पावसाने पेरणी झालेल्या पिकांना लाभ होणार आहे.
पावसाळा सुरु होवून दीड महिना उलटला असला तरी तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. गेली दोन दिवस काही भागात रिमझिम पावसाच्या सरी आल्या. सरासरी अवघ्या दोन मिलीमीटर पावसाची नोंद झाली. (Nashik Monsoon Rain lashed Malmatha area Heavy rain in Kalwadi)
माळमाथ्यावर दोन तास झालेल्या दमदार पावसामुळे समाधानाचे वातावरण आहे. या भागात २२ ते २७ जून दरम्यान झालेल्या पावसानंतर वाफसा होताच शेतकऱ्यांनी कापूस, मका, बाजरी, भुईमूग या पिकांची पेरणी केली होती.
पेरणी झालेल्या पिकांना पावसाची गरज असतानाच आज दुपारी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून पिकांना जीवदान मिळाले आहे. पुनर्वसू नक्षत्रात माळमाथ्याला दिलासा मिळाला आहे.
येथील शेंदुर्णी, शेरुळ, साजवहाळ, नाळे, रोझे, चिखलओहोळ, दहिवाळ आदी भागाला आज दोन तास जोरदार पावसाने झोडपले. माळमाथा भागात बरड शेतजमीन असल्याने विविध ठिकाणी शेतातून पावसाचे पाणी वाहत होते.
शेंदुर्णी भागातील नाले तुडूंब भरून वाहत असल्याने येथील गाव तलावात १० ते १५ पाणीसाठा झाला. तालुक्यात अद्यापही अनेक गावांना पेरण्या झालेल्या नाहीत. पेरणीसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
कळवाडीत दमदार हजेरी
कळवाडी (ता. मालेगाव) परिसरात बुधवारी (ता.१२) दुपारी पावसाने जोरदार हजेरी लावली. पहिल्या पावसानंतर दहा बारा दिवसांनी दीड तास झालेल्या पावसाने नाले तुडुंब भरून वाहू लागले.
दरम्यान कळवाडी ते देवघट रस्त्यावर दापूरे फाट्याजवळ असलेल्या शिवपाट नाल्यावरील फरशीवर पाणी वाहत असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. दुसऱ्या टप्यात दमदार पाऊस झाल्याने बळिराजा सुखावला आहे.
कळवाडी परिसरातील दापूरे, साकूर, नरडाणे, देवघट, सायतरपाडे, पाडळदे या परिसरात पाऊस झाला. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कपाशीचे पीक घेतले जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.